महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुक्ताईनगर तर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी | मुक्ताईनगर प्रणित काठोके
मुक्ताईनगर शहरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रॅली काढून उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
मुक्ताईनगर बस स्थानक ते मुक्ताईनगर बस डेपो रॅली काढण्यात आली. यावेळी कर्मचारी, चालक-वाहक, अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी भगवी टोपी व बिल्ले परिधान करून घोषणाबाजी करत शहरातून फेरी काढली. महाराजाच्या गाण्याच्या गजरात आणि भगवा झेंडा फडकवत वातावरण शिवमय झाले होते.
मुक्ताईनगर आगार प्रमुख प्रभाकर मोरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही रॅली काढण्यात आली असून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सहभागींसाठी स्नेहभोजनचे आयोजन करण्यात आले.
मुक्ताईनगरमध्ये परिवहन महामंडळाने आयोजित केलेली ही शिवजयंती रॅली आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.








