एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी, किनगाव येथील व्यक्तीविरुद्ध गुन्हा

गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणीची मागणी,
किनगाव येथील व्यक्तीविरुद्ध गुन्हा

✒️यावल तालुका प्रतिनिधी रविंद्र आढाळे✒️

यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुकचे माजी सरपंचांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा यावल पोलिस ठाण्यात दाखल आहे. हा गुन्हा मागे घेण्यासाठी तसेच साक्षीदारांचे जबाब फिरवण्यासाठी १ लाख २५ हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप किनगाव येथील एकावर माजी सरपंच यांनी केला. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात एकाविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.
किनगाव बुद्रुक येथील माजी सरपंच मिलिंद चौधरी यांच्याविरूद्ध काही दिवसांपूर्वी यावल पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा मागे घेण्यासाठी व त्यातील साक्षीदारांना त्यांचे जबाब फिरवण्यासाठी किनगाव येथील रहिवासी रामचंद्र पाटील यांनी १ लाख २५ हजार रुपयांची खंडणी मागितली व या संदर्भातील एक फोन त्यांनी चौधरी यांच्या एका मित्राला करून धमकी दिली. पैसे न दिल्यास माझी माणसे चौधरीविरुद्ध साक्ष देतील, असे सांगितले. सुरुवातीला त्यांनी दोन लाखांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख २५ हजार देण्याचे ठरले. त्यासाठी वारंवार कॉल केल्याने मिलिंद चौधरींनी यावल पोलिसांत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपास निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करत आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link