एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

जालना पोलीसांची दमदार कारवाई, आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करुन अमाणुषपणे मारहाण करुन लुटमार करणारे तीन आरोपीतांना घेतले ताब्यात.

जालना पोलीसांची दमदार कारवाई, आईस्क्रीम विक्रेत्याचे अपहरण करुन अमाणुषपणे मारहाण करुन लुटमार करणारे तीन आरोपीतांना घेतले ताब्यात.

प्रतिनिधी रणजीत मस्के

पोलीस ठाणे तालुका जालना येथे दिनांक 22.01.2026 रोजी सायंकाळी 17.00 वाजता पोलीस नियंत्रण कक्ष जालना येथून माहीती मिळाली कि, मंठा रोडवरुन एका आईसक्रीम विक्रेत्यास काही लोकांनी मारहाण करुन जबरीने त्याचे गाडीत बसवून अपहरण करुन नेले आहे व अज्ञातस्थळी नेवून मारहाण करून पैशांची मागणी करीत आहेत व पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत आहेत अशी माहीती मिळताच पोलीस ठाणे तालुका जालना चे पोलीस निरीक्षक श्री. संतोष साबळे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ डी. बी. पथकासह तीन तपास पथके तयार करुन सुचना देवून अपहृत व्यक्तीचा पोस्टे हद्दीत नाव्हा, सिधीकाळेगाव व वाघरुळ याप्रमाणे शोध घेणेकामी रवाना केले, परंतु आरोपीना अपहृत व्यक्तीचे मोबाईलवर फोनपे वरुन पैसे मिळताच अंधाराचा फायदा घेवून मोबाईल बंद करुन फरार झाले शोध पथकाने अपहृत व्यक्ती आणि वाहन हे मंठा चौफुली येथून अवघ्या दोन ते अडीच तासात सुटका करुन त्यास अमाणुष मारहाण झालेली असल्याने त्यास वैद्यकीय उपचाराकामी संतकृपा हॉस्पीटल जालना येथे दाखल केले, फिर्यादी नामे नवरत्न प्रकाश पुरी वय 19 वर्ष रा. भिलवाडा (राजस्थान) ह.मु. गायत्रीनगर जालना यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक डिगांबर पवार हे करीत आहेत. पोलीस ठाणे तालुका जालना गुन्हे शोध पथक आरोपीतांचा शोध घेत होते परंतु आरोपींबाबत काहीही उपयुक्त माहीती मिळून येत नसल्याने जालना जिल्हयातील अशा पध्दतीने गुन्हे करणारे सर्व आरोपी यांची माहीती संकलीत करुन संशयित गुन्हेगारांचे फोटो गुन्ह्यातील पीडीत यांस दाखवले, दिनांक 22.01.2026 रोजी अशाच प्रकारचा गुन्हा करुन इसम नामे ओमकार मारुती पवार रा. पिरकल्याण ता.जि.जालना हमु. कल्याण (ठाणे) हा दिनांक 22.01.2026 रोजीपासून फरार असले बाबत माहीती मिळालेवरुन त्याच्या सोबतचे त्याचे मिञ नामे सचिन शिवशंकर केदारे, रा. गांधीचमन माळीपुरा जुना जालना व सुमित शैलेश डुरे, रा. विठठल मंदीर कज्बा जुना जालना यांचा शोध घेत असतांना ते जालन्याकडून देउळगावराजा कडे जात असल्याची माहीती मिळताच पोलीस स्टेशन तालुका जालना गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार यांनी देऊळगावराजा येथून दोन्ही इसमांचा पाठलाग करुन ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी व त्यांचा साथीदार ओमकार मारुती पवार यांनी संयुक्तरित्या गुन्हा केल्याची कबूली दिली म्हणून त्यांना पोलीस स्टेशनला आणून गुन्ह्यात अटक केले. तसेच फरार आरोपी नामे ओमकार मारुती पवार हा पुणे येथे असले बाबत माहीती मिळाल्याने त्याला पुणे व अहिल्यानगरचे सीमेवरुन एका हॉटेलमधून दिनांक 04.02.2026 रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास ताब्यात घेवून पोलीस स्टेशनला ला आणून विचारपूस केली असता त्याने देखील गुन्हा केल्याची कबूली दिल्याने त्यास सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली. सदर गुन्हयातील तीन्ही आरोपीत सध्या पीसीआर मध्ये आहेत.

नमुद आरोपीताकडुन गुन्हयात वापरलेला आरोपीचा मोबाईल, चोरी गेलेला फिर्यादीचा मोबाईल, फिर्यादीचे फोन पे व्दारे वेगवेगळया ठिकाणावरुन काढलेले व फिर्यादी जवळचे बळजबरीने काढलेले आरोपीतांकडुन असे एकूण 6900/-रुपये, आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले दोन लाकडी काठ्या, एक आईसक्रीम कटर, नट खोलन्याचा पान्हा व फिर्यास बांधन्यासाठी वापरण्यात आलेली दोरी ईत्यादी मुददेमाल आरोपीतांकडुन जप्त करण्यात आला.

सदरची कामगिरी श्री. अजयकुमार बन्सल (पोलीस अधीक्षक जालना), श्री. आयुष नोपाणी (अपर पोलीस अधीक्षक), श्री. अनंत कुलकर्णी (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे तालुका जालना चे श्री संतोष साबळे (पोलीस निरीक्षक), दिगंबर पवार (पोलीस उप निरीक्षक), पोलीस अंमलदार सचिन आर्य, विशाल काळे, दयानंद मोरे, राम शेंडीवाले, वंसत धस, चंद्रकांत माळी, उषा चव्हाण, आदींनी पार पाडली.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link