एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पुण्यात नियोजन बैठक संपन्न

अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी पुण्यात नियोजन बैठक संपन्न

प्रतिनिधी हंसराज पाटील

पुणे : अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या दृष्टीने आज पुणे येथे एक महत्त्वाची नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे अध्यक्षपद श्री कैलासनाथजी नंदा (प्रसिद्ध हिंदुत्ववादी उद्योगपती) यांनी भूषविले.
या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध संघटनांचे सुमारे 70 प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. *हिंदू नेटवर्क* आणि *स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था* द्वारा आयोजित अखिल हिंदू साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी 15 प्रमुख समित्यांची रचना या बैठकीत करण्यात आली असून, प्रत्येक समितीत 7 ते 8 प्रमुख कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियोजन प्रक्रियेत हिंदू नेटवर्कचे मुख्य समन्वयक श्री सुनील सोनवणे, प्राचार्य डॉ.संजय भांडारकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे श्रीनिवास कुलकर्णी, विश्व हिंदू परिषदेच्या धार्मिक विभागाचे संजय मुरदाळे, तसेच सनातन संस्थेचे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले होते.
बैठकीत संमेलनाच्या कार्यक्रम रचनेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रस्तावित दिनांक १९ ते २२ एप्रिल २०२६ ला पुण्यात होणारे अखिल हिंदू साहित्य संमेलनात ग्रंथ दिंडी, उद्घाटन, हिदू सांस्कृतिक कार्यक्रम, कवी कट्टा, हिंदू साहित्यावर आधारित व्याख्याने, धर्मविचार मांडणारे परिसंवाद, तसेच पारंपरिक हिंदू वाद्य व कला सादरीकरण यांचा समावेश असणार आहे. यासोबतच काही विशेष प्रकट मुलाखतीही घेण्यात येणार आहेत. तसेच हिंदू धर्मासाठी जागरणात्मक व निःस्वार्थ कार्य करणाऱ्या विशेष व्यक्तींना संमेलनात “*हिंदू तेज पुरस्कार*” देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अखिल हिंदू साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात अक्षय तृतियेच्या शुभ मुहूर्तावर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात येणार असून, या बैठकीद्वारे संमेलनाच्या तयारीला अधिक गती देण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link