पुण्याच्या महापौर, उपमहापौरांना पालिकेकडून नवी कार
पुणे महापालिकेत नव्या सभागृहातील महापौर, उपमहापौर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, प्रभाग समिती व इतर विशेष समितीच्या अध्यक्षांच्या मदतीला आलिशान गाड्या असणार आहेत. महापौरांसाठी ‘हायक्रॉस’ तर उपमहापौरांना ‘व्हर्ना’ ही कार देण्यात येणार आहे. विरोधी पक्ष नेता व शहर सुधारणा समिती अध्यक्षांना ‘व्हिक्टोरिअस’ या अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त आलिशान गाड्या मिळणार आहेत, तर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह समिती अध्यक्षांनाही तितक्याच महागड्या गाड्या मिळणार आहेत. महापालिकेकडून अशा २८ गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत, त्यावर तब्बल सव्वापाच कोटी रुपये इतका खर्च केला जाणार आहे.








