एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

श्री प्रभु विश्वकर्मा मंदिराचे भुमिपुजन समारंभ मंत्री रावल यांच्या हस्ते ७ मार्च रोजी होणार…

श्री प्रभु विश्वकर्मा मंदिराचे भुमिपुजन समारंभ मंत्री रावल यांच्या हस्ते ७ मार्च रोजी होणार…

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज श्रीहरी अंभोरे पाटील

(वि.प्र.) धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात खर्दे शिवारात भव्य दिव्य प्रभु विश्वकर्मा यांच्या मंदिराचे भुमीपूजन महाराष्ट्र राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालक मंत्री मा. जयकुमारभाऊ रावल तसेच दोंडाईचा वरवाडे नगरपपिषेदेचे नगराध्यक्षा नयनताई कुवर रावल व उद्योगपती सरकार साहेब रावल यांच्या शुभ हस्ते दिनांक ७ मार्च २०२६ शनिवार रोजी सकाळी १० वा. स्टॅच्यू ऑफ विश्वविधाता खर्दे शिवार ता. शिंदखेडा जि. धुळे येथे संपन्न होणार आहे. या समारंभास मा. जयंतीभाई विश्वकर्मा राजस्थान, प्रविण वराडकर मुंबई, नारायण शेलार दहिसर, चंद्रकांतजी गवळे, प्रदेश अध्यक्ष विराट विश्वकर्मा, सुदाम अण्णा खैरनार, अखिल महाराष्ट्र सुतार लोहार समाज, नरेश हिरे, अध्यक्ष विश्वकर्मा संस्था धुळे, संतोष मिस्तरी उपध्यक्ष विश्वकर्मा धुळे, पराग अहिरे, पद्मश्री बिल्डर्स, सुदाम खारकर विश्वकर्मा बहुउद्देशिय संस्था मुंबई, सोमनाथ मिस्तरी नवयुक विश्वकर्मा मंडळ नंदुरबार या सारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. या प्रसंगि प्रभु विश्वकर्मा व खाटुशाम या दोन्ही मंदिराचे भुमिपुजन करण्यात येणार आहेत. सुमार २००० चौरस फुटाचे १ मंदिर असुन त्यांची उंची सुमारे ५५ फुट करण्यात येणार आहे. यासंदर्भात या वास्तुचे शिल्पकार यांनी नुक्तीच प्रभु विश्वकर्मा मंदिराची जागा पाहाणी करुण बांधकामाचा करार करण्यात आला आहे. त्यामुळे हे शिल्प लवकरच पूर्ण होणार असे अयोजाकांनी सांगीतले. त्याचबरोबर या जागी भव्य दिव्या अनेक मंदिरे भविष्यात उभारण्यात येणार असून येत्या काळात या जागी भव्य दिव्य स्टॅच्यू ऑफ विश्वविधाता हे पर्याटक स्थळ म्हणून ओळले जाईल. या ठिकाणी राम मंदिर, महादेव मंदिर, खाटूशाम मंदिर, विठ्ठल रुख्मणी मंदिर, कानु मातेचे मंदिर, हे महत्वाचे आकर्षण ठरणार आहे. ५५१ फुटाचा प्रभु विश्वकर्माचा पुतळ पर्याटकांचे लक्ष वेधून घेणार आहे. त्याच बरोबर याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ही पर्याटकांचे आकर्षण ठरणार आहे.

भव्य दिव्य गार्डन व निवासी सुविधा उपलब्ध राहणार असून संस्थेचे हॅलीपॅड येथे उपलब्ध आहे. अशा या भव्यदिव्य प्रक्लपासह मंदिराचा भुमिपुजनाचा शुभरंभास मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी उपस्थित राहण्याचे अश्वासन स्टॅच्यू ऑफ विश्वविधालाचे विश्वस्त श्री मंगेशकुमार व सदाशिव मिस्तरी यांना दिले. या कामाची सुरुवात म्हणून प्रथम विश्वकर्मा मंदिर उभारुन विश्वविक्रमाकडे वाटचाल संघटना करीत आहे. असे एका माहिती पत्रकात प्रसिध्द करण्यात आले आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link