*नागपूर ग्रामीणच्या एलसीबीला खमक्या अधिकारी, अंकुश माने यांनी स्वीकारला पदभार ! संभाजी पुरीगोसावी ( नागपूर जिल्हा ) प्रतिनिधी. पोलीस दलात म्हणजेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद हे महत्त्वांचे मानले जाते या पदावर येण्यासाठी अनेक अधिकाऱ्यांची नेहमी वरचढ दिसून येते. नागपूर ग्रामीण पोलीस दलातही एलसीबी पदावर कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक ओम प्रकाश कोकाटे हे सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांच्या या रिक्त जागेवर नांदेड वरून नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक अंकुश माने यांची नागपूर ग्रामीणचे आदरणीय पोलीस अधीक्षक हर्ष ए.पोद्दार यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी 1 जानेवारी 2022 मध्ये नागपूर ग्रामीण एलसीबी पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारला होता. पोलीस निरीक्षक कोकाटे हे या पदावर नेहमीच प्रयत्नशील राहिले, तर अंकुश माने हे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जातात. पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण नांदेड सोलापूर अशा विविध जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा बजावली आहे. त्यांच्या नव्या नियुक्तीमुळे नागपूर ग्रामीणच्या एलसीबी पदावर आता खमक्या अधिकारी मिळाल्याचे बोलले जात आहे.*








