नागपूर ग्रामीण पोलीस महाराष्ट्रांत अव्वल दोनशे पैकी मिळवले 161 एकाच क्लिकवर सर्व अध्यादेश ! नागपूर ग्रामीण पोलिस राज्यांत दुसऱ्या क्रमांकावर!
संभाजी पुरीगोसावी नागपूर जिल्हा प्रतिनिधी
स्वातंत्र्य मिळाल्यापासून पोलीस दलात हळुवार का होईना, पण बदल घडत आहे. मोठे जिकीरीचे कार्य होते. परंतु नागपूर ग्रामीण पोलिसांनी ई-ऑफिस अंतर्गत एकाच क्लिकवर पोलीस विभागातील सर्व अध्यादेश मिळवून देण्याचे कार्य पूर्ण केल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून महाराष्ट्रांत 150 दिवसांचा गव्हर्नन्स सुधारणा मूल्यमापन कार्यक्रम पार पडला. यामध्ये नागपूर ग्रामीण पोलिसांनी राज्यात दुसऱ्या क्रमांकावर 200 पैकी 160 गुण मिळवून राज्यांत दुसरा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी 100 दिवसांचा कार्यक्रम पार पडला होता. त्यातही ग्रामीण पोलिसांनी सर्वोत्कृंष्ट कामगिरी केली आहे. यावेळी नागपूर ग्रामीण पोलिसांचे विशेष कौतुक करीत सर्व स्तरांतून अभिनंदनचा वर्षाव करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांच्या नुकताच पार पडलेल्या कार्यक्रमाप्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे खासदार श्यामकुमार बर्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप जी. पाटील जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिंदारी यांच्याहस्ते नागपूर पोलिसांचा सन्मान करण्यात आला यावेळी नागपूर पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले आहे.








