एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सेनगाव पोलिस ठाण्यास तात्काळ पोलीस निरीक्षक नियुक्तीची मागणी

सेनगाव पोलिस ठाण्यास तात्काळ पोलीस निरीक्षक नियुक्तीची मागणी
हिंगोली. श्रीहरी अंभोरे पाटील

नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची भेट घेऊन केली मागणी
हिंगोली जिल्ह्यातील
सेनगाव तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सेनगाव पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदासह विविध रिक्त पदांचा तात्काळ भरणा करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची प्रत्यक्ष सेनगाव पोलीस ठाण्यात भेट घेऊन केली मागणी.

सेनगाव पोलिस ठाण्याचे प्रमुख असलेले पोलीस निरीक्षक पद मागील काही महिन्यांपासून रिक्त असून, सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. सध्या केवळ एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व सुमारे ५० पोलीस अंमलदारांच्या अपुऱ्या मनुष्यबळावर जवळपास ८० गावांतील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर आहे.
शनिवारी (ता. १७) रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सेनगाव पोलिस ठाण्याला भेट देत पिडीत तक्रारदारांच्या अडचणींचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधित प्रकरणांचे तातडीने व योग्य पद्धतीने निराकरण करण्याचे समाधानकारक आश्वासन दिले. तसेच ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुन्हे तपासाबाबत स्पष्ट सूचना देत सक्त ताकीद केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी सेनगाव तालुक्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, तसेच तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजारपेठ असल्याने येथे पोलिस निरीक्षकासारख्या जबाबदार अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती अत्यावश्यक आहे. विशेषतः बुधवारच्या आठवडी बाजारात परजिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक संवेदनशील ठरतो.
यामुळे सेनगाव पोलिस ठाण्यातील रिक्त पोलीस निरीक्षक पद तात्काळ भरण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
चौकट
सेनगाव तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक पद दीर्घकाळापासून रिक्त आहे. कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी सेनगाव पोलिस ठाण्याला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर नगरसेवक ओमप्रकाश देशमुख यांनी सदर पद तात्काळ भरण्याची ठाम मागणी केली आहे.
ओमप्रकाश देशमुख
नगरसेवक

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link