सुरक्षित वाहतुकीसाठी RTO जळगांव अंतर्गत ‘सीमा तपासणी नाका कर्की’ येथे विशेष उपक्रम राबविण्यात आला
जळगाव जिल्हा प्रतिनिधी प्रणित काठोके
– रिफ्लेक्टर लावा, अपघात टाळा.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सीमा तपासणी नाका कर्की येथे वाहनांना रिफ्लेक्टर्स लावण्याची मोहीम राबवण्यात आली. केवळ रिफ्लेक्टर्सच नाही, तर वाहन चालकांशी संवाद साधून त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले.
– मशिनरी चालवा जपून, नियमांचे पालन करून
रस्त्याचे काम सुरू असताना अपघात टाळण्यासाठी कर्की नाका येथे विशेष खबरदारी घेण्यात आली. मशिनरींना रिफ्लेक्टर्स लावण्यासोबतच, मजुरांना कामाच्या ठिकाणी सतर्क राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच ‘सुरक्षित काम, सुरक्षित जीवन’ या उक्तीप्रमाणे चालक आणि कामगारांचे प्रबोधन करण्यात आले.
या प्रसंगी मोटार वाहन निरीक्षक सौरभ पाटील, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रंजीत टिके उपस्थित होते.









