एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

कॉप्या करता आल्या नाहीत म्हणून नरसिंह विद्यामंदिर उमरदरीच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांकडे पैसे वापस करण्याची मागणी.

कॉप्या करता आल्या नाहीत म्हणून नरसिंह विद्यामंदिर उमरदरीच्या विद्यार्थ्यांची शिक्षकांकडे पैसे वापस करण्याची मागणी.

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सखाराम कुलकर्णी

नांदेड- परीक्षेत कॉप्या करू देतोत, कॉप्या पुरवतोत अशा आश्वासनावर नरसिंह विद्यामंदिर उमरदरीच्या शाळेतील शिक्षकांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेत. पण आता कॉपीमुक्ती धोरणामुळे या विद्यार्थ्यांना कॉप्या करण्यास व त्यांना देण्यास त्या शिक्षकांना वाव मिळाला नाही. म्हणून बरेच विद्यार्थी शाळेतील पैसे घेतलेल्या शिक्षकांकडे पैसे परत मागणी करत आहेत. यावर्षीच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत राज्यात कॉपीमुक्ती पॅटर्न राबवण्याचे धोरण शासनाने ठरवले होते. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी कॉपीमुक्ती परीक्षा झाल्याच पाहिजेत. यासाठी सर्व विभागाच्या यंत्रणा कामाला लावल्या होत्या. कॉप्यासाठी ज्या शाळा प्रसिद्ध आहेत तेथील पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख बदलून दुसऱ्या शाळेचे नियुक्त केले होते. तसेच बैठे पथक तयार केले होते. त्यामुळे कॉप्या करण्यास व कॉप्या देण्यास वाव मिळाला नाही .जर कॉपी करताना विद्यार्थी दिसला तर त्याला रेस्टीकीट व पर्यवेक्षकाला कारणे दाखवा नोटीस दिल्या जाईल . असे सुचित केले होते .तरीपण नरसिंह विद्यामंदिर उमरदरी ता. मुखेड शाळेत काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून कॉपी पुरवण्यासाठी वीस ते पंचवीस हजारात टेंडर घेतले होते. अशा शिक्षकांनी सुरुवातीला एक -दोन दिवस कॉप्या पुरवल्या होत्या. भौतिक शास्त्राच्या पेपरच्या दिवशी दिलीप कुमार बनसोडे शिक्षणाधिकाऱी यांनी धाड टाकून दोन विद्यार्थ्यांना रेस्टीकीट केले व केंद्र संचालक पर्यवेक्षक, परीक्षा हॉलमध्ये तपासून पाठवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही दिली होती. यानंतर त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न आल्यामुळे केंद्र संचालक बिराजदार एस.एल. यांना हलगर्जी केल्यामुळे निलंबित केले. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले व विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्यास व करू देण्यास अडचणी आल्या. बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोरे पेपर सोडवावे लागले. अशा विद्यार्थ्यांनी शाळेतील काही शिक्षकांना कॉफीसाठी दिलेले पैसे वापस मागण्यास सुरुवात केली

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link