पुण्यात गुन्हेगारी मोठा आळा,गावठी कट्टा जिवंत काडतुसेसह आरोपी पोलिसांच्या जाळ्यात, भारती विद्यापीठ पोलिसांची दमदार कामगिरी ! सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) प्रतिनिधी. पुणे शहरांत गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी सध्या सुरू असलेल्या कारवाईत भारती विद्यापीठ पोलिसांना यश मिळाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिंतीच्या आधारे नवले पुलाजवळील राजमाता उद्यानासमोरील सर्व्हिस रोडवर 19 वर्षीय तरुण गावठी कट्टा व जिवंत काडतुसे असे घेवुन फिरत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांनी आपल्या पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण विभागांच्या पोलिसांना कारवाईबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता आरोपी गावठी कट्टा व जिवंत काडतुसे ते घेवुन थांबला होता पोलिसांनी त्याचे अंगझडती घेवुन पोलीस ठाण्यात आणला त्याच्या विरोधांत गुन्हा दाखल केला सदर कारवाईत आरोपींच्या ताब्यांतून सुमारे 50,000 रुपयांची किंमत असलेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतुसं राऊंड हस्तगत करण्यात आला. अभिषेक कैलास दांगट (वय 19) फ्लॅट नंबर 507 वृंदावन विश्व तानाजी नवले इंडस्ट्रीज नऱ्हे रोड पुणे) असे आरोपींचे नाव आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 03/2026 भारतीय हत्यार अधिनियम कलम 3/25 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(1)/135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी अण्णा दराडे अंमलदार नितेश चोरमोले महेश बारवकर मंगेश पवार निलेश खैरमोडे मंगेश गायकवाड किरण साबळे तुकाराम सुतार संदीप आगळे यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.*








