द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सारंग महाजन यांची नियुक्ती
प्रतिनिधी अनघलक्ष्मी दुर्गा
बुलढाणा जिल्हा चिखली येथील द युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी सारंग महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष अन्सार शेख यांनी यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
सारंग महाजन यांची सामाजिक, पत्रकारितेतील योगदान व संघटनात्मक बांधीलकी पाहता जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याचे अन्सार शेख यांनी म्हटले आहे. संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे अभिनंदन केले असून या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी निवड होताच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी, पत्करांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच ज्येष्ठ पत्रकारांच्या आरोग्यासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी सारंग महाजन यांनी म्हटले आहे. जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.








