बेलखेड येथे लष्करी या अडीमुळे अतिभंयकर कांदा या पिकाचे नुकसान
तेल्हारा प्रतिनिधी-पवन खुमकर
आदी सलग पावसामुळे सोयाबीन चे अतिनुकसान झाले.
त्यानंतर कपाशी पिकाचे नुकसान,अनेक शेतकरी यांच्या शेतीतून कापूस वाहून गेला.
त्या नंतर रब्बी पिकासाठी उंमेदीने उभा राहलेला शेतकरी,त्यात पण कांदा या पिकावर मोठया प्रमाणात अडी आल्या मुळे अनेक शेती उदवस्त होत आहे.त्यातील बेलखेड येथील एक शेतकरी श्री.सतीश दिनकर खुमकर आदीचे पीक न झाल्यामुळे कर्ज काढून शेत पेरले त्यात कांदा हे बी टाकल्यानंतर अडीचे फवारे रात्रंदिवस मारून सुद्धा अडी ने एवढे नुकसान केले की सतीश या शेतकरी बंधूंना 2 एक्कर शेती मोडावे लागले त्यात 20,25 हजार रुपयांचे नुकसान झाले तरी ही बाब शासनाने लक्षात घेता कृषी विभागाने या कडे लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना कराव्यात व काही आर्थिक मदत या शेतकरी बांधव यांना करावी ही शेतकरी विनंती करत आहेत.









