अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पत्रकार गिरमाजी सुर्यकार यांना महाराष्ट्र राज्य युवक आधार रत्न पुरस्काराने सन्मानित!
न्यूज 18 चे सहसंपादक विलास बडे सर आणि साम टीव्ही चे संपादक निलेश खरे सर यांच्या हस्ते प्रदान
धर्माबाद प्रतिनिधी गजानन वाघमारे
पनवेल आणि महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘दैनिक युवक आधार’ या वृत्तपत्राचा दुसरा वर्धापनदिन सोहळा रविवार दि ७ सप्टेंबर रोजी उत्साहात आणि थाटामाटात पार पडला. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.सोहळ्याचे उद्घाटन उद्योगपती सुधीर कटेकर, न्यूज १८ लोकमतचे सहसंपादक विलास बडे, साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे आणि प्रसिद्ध अभिनेत्री माधवी जुवेकर,उद्योगपती सुधीर कटेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाला बाल कलाकार अर्जुनी सस्ते, समीर पाडळकर,सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी विलास बडे यांनी सांगितले, की प्रत्येक व्यक्तीने संधी आल्यावर आपला कणा दाखवायला पाहिजे. जिथे अन्याय होतो त्या ठिकाणी पत्रकारांनी व जनतेने आपली भूमिका स्पष्ट करून, न्याय मिळवण्यासाठी झटले पाहिजे, तसेच “ज्या ठिकाणी आपली स्पष्ट भूमिका मांडावी अशी वेळ येते, तिथे मौन पाळणे योग्य नाही. पत्रकारिता हे केवळ बातम्या देण्याचे काम नसून, ती एक सामाजिक जबाबदारी आहे. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आपण सक्रिय भूमिका बजावली पाहिजे.”असे शब्द त्यांनी व्यक्त केले. तर त्यांनी या वृत्तपत्राने अल्पावधीत केलेल्या सत्यासमाजहिताच्या कामाचा उल्लेख केला.
समाजातील युवकांना प्रेरणा देणाऱ्या आणि सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दैनिक युवक आधार तालुका प्रतिनिधी गिरमाजी सुर्यकार यांना महाराष्ट्र राज्य युवक आधार रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.या यशाबद्दल जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था तसेच मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
@ चौकट@
*पुरस्कार स्वीकृतीवेळी व्यक्त केलेल्या भावना*
पुरस्कार स्वीकारल्यानंतर गिरमाजी सुर्यकार यांनी सांगितले की,
“हा पुरस्कार माझ्या सोबत सतत खंबीरपणे उभ्या असलेल्या मार्गदर्शक व कार्यकर्त्यांचा आहे. युवकांना प्रेरणा देणारे काम करण्याची हीच खरी वेळ आहे आणि हा सन्मान पत्रकार क्षेत्र आणि समाजकारणासाठी आणखी माझ्यासाठी आणखी उर्जा देणारा आहे.” हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद धर्माबाद चे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, सचिव गणेश वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार जी. पी.misale सर गंगाधर धडेकर, सुधाकर जाधव गजानन वाघमारे, लक्ष्मण तुरेराव, मीनाताई भद्रे, लक्ष्मण पाटील yetale,डॉ. किशन कांबळे, सय्यद इलियास, गंगाधर वाघमारे, मतीन सर, मोहम्मद moiz,आदी यांच्या कडून सुद्धा भर भरून शुभेच्छा देण्यात आल्या.
