एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सोलापूर हादरले, स्वतःवर गोळी झाडून तरुणाने संपविले जीवन विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती समोर.. घटनास्थळी पोलीस दाखल

सोलापूर हादरले, स्वतःवर गोळी झाडून तरुणाने संपविले जीवन विवाहबाह्य संबंधातून कृत्य केल्याची माहिती समोर.. घटनास्थळी पोलीस दाखल,

कलावती गवळी सोलापूर जिल्हा  प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बार्शी तालुक्यातील सासुरे येथे एका तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवाहबाह्य संबंधातून या तरुणांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गोविंद जगन्नाथ बर्गे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यांतील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. आज सकाळपासून एका काळया रंगाची चारचाकी शेतात उभी असल्याची याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता गोविंद बर्गे हे मृतावस्थेत आढळून आले, पोलिसांना गाडीतच एक पिस्तूल देखील आढळून आले असून त्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण काय? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. गोविंद बर्गे यांने स्वतःवर गोळी झाडून घेतली की अन्य काही घडले या दृष्टीने देखील पोलीस कसून तपास करीत आहेत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link