दिनांक 6 सप्टेंबर हा नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुहास आण्णा कांदे यांचा वाढदिवसाचा दिवस आहे. मात्र, यावर्षी हा दिवस उत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्याऐवजी मानवतेच्या सेवेसाठी अर्पण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कारण सध्या पंजाब राज्यामध्ये झालेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण देशाचे मन हेलावून गेले आहे.
मनमाड प्रतिनिधी सतीश परदेशी
या आपत्तीत असंख्य निरपराध नागरिकांचे प्राण गेले, हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली, प्राणी वर्गाचा नाश झाला, शेती आणि नैसर्गिक संपत्तीचे अपरिमित नुकसान झाले, अनेक गावांचे अस्तित्वच धोक्यात आले. या संकटात मानवी जीवनासोबतच निसर्गातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणावर हानी सोसली आहे. ही दुःखदायी परिस्थिती पाहून आमदार सुहास आण्णा कांदे यांनी स्वतःचा वाढदिवस साजरा करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
म्हणूनच यावर्षी त्यांनी कोणताही वाढदिवसाचा कार्यक्रम, समारंभ, सोहळा न करता, कोणत्याही प्रकारच्या पुष्पगुच्छ शुभेच्छांचा स्वीकार न करता, पाहुण्यांचा व मित्रपरिवाराचा पाहुणचार टाळून त्यावर होणारा संपूर्ण खर्च पंजाब राज्यातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्धार केला आहे.
याअंतर्गत दिनांक 6 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या दिवशी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी ₹9,00,000 (नऊ लाख रुपये) ही रक्कम गुरुद्वारा, मनमाड यांच्या स्वाधीन सुपूर्द केली आहे. गुरुद्वारा व्यवस्थापनामार्फत ही रक्कम थेट पंजाबमधील आपत्तीग्रस्त कुटुंबे, प्राणी संरक्षण कार्य व उद्ध्वस्त झालेल्या नैसर्गिक संपत्तीच्या पुनर्संचयनेसाठी वापरली जाणार आहे.
हा निर्णय केवळ आर्थिक मदत नसून समाजाला दिलेला एक खोल संदेश आहे की – “वाढदिवसाचे खरे औचित्य हे लोककल्याणात आहे, मानवतेपेक्षा मोठे काहीही नाही.”
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या या उपक्रमामुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघात तसेच संपूर्ण महाराष्ट्रात एक संवेदनशील व जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचे कार्य अधिक अधोरेखित झाले आहे.
या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी आमदार राजेंद्र देशमुख, सहसंपर्क प्रमुख अल्ताफ बाबा खान, राजाभाऊ भाबड, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, राजाभाऊ पगारे, जिल्हा संघटक नाना शिंदे, जिल्हा समन्वयक संजय कटारिया, गंगादादा त्रिभुवन, महिंद्र शिरसाठ, कैलास गवळी, विकी जट, राजू जाधव, लाला नागरे, सुभाष माळवतकर, दिनेश घुगे, संजय चावरिया, महेश बोराडे, वल्लभ लहीरे, अमोल दंडगव्हाळ, गुरदीप सिंग, गुरजीत सिंग, शांकी जग्गी, हरप्रीत सिंग, शांकी धिंग्रा, सुखदेव सिंग, प्रदीप साळवे, लक्ष्मण गवळी, गप्पी ठकराल, बबन फुलवाणी, राकेश चव्हाण, सचिन दरगुडे, मयूर गोसावी, निलेश व्यवहारे व शिवसेना, भाजपा, आरपीआय कार्यकर्ते व इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
