अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
दरड कोसळून महिलेचा मृत्यू झालेल्या गावात राजकारणाचा खेळ
प्रतिनिधी मुकूंद मोरे
रायगड जिल्हा
मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात दरड कोसळून विठा गायकर या वृद्धेचा मृत्यू झाला अख्खा गाव शोकाकुल असताना मिंध्यांचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नीने मात्र हाणामारी केली दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या अंगावर हात उगारला आणि धक्काबुक्की केली या घटनेमुळे गावकरी अधिकच संतप्त झाले आणि त्यांनी मानसी दळवी यांना इथून चालते व्हा आम्ही आणि गावाच्या बाहेरचा रस्ता दाखवला.
तुफानी पावसामुळे मिठेखार गावावर सकाळीच दरड कोसळली या दुर्घटनेत विठा गायकर 75 यांचा जागीच मृत्यू झाला अवघा गाव शोकाकुल झाला नातेवाईकांचा आक्रोश सुरू होता शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांना ही बाब कळताच त्यांनी गावात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
