अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या :- अधिकाऱ्यांनी तात्काळ रुजू व्हा:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
परभणी,वाशिम अकोला,वर्धा जिल्हाधिकारी बदलले.!
संगीता इनकर मुंबई प्रतिनिधी
राज्यांतील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या गेल्या काही महिन्यांत सातत्याने होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सिलसिला सुरूच असूनही आताही गेल्याच आठवड्यात 7 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी सायंकाळी राज्य सरकारकडूंन पाच ( आयएएस ) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये परभणी,अकोला वाशिम या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी बदलले आहेत. यामध्ये बदल्या झालेले ( आयएएस अधिकारी पुढील प्रमाणे ) संजय चव्हाण ( IAS:SCS:२०११) अतिरिक्त नियंत्रक, मुद्रांक, मुंबई यांची परभणी येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रघुनाथ गावडे ( IAS:SCS:२०११) जिल्हाधिकारी, परभणी यांची मुंबई येथे अतिरिक्त नियंत्रक, मुद्रांक, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती बुवेनेश्वरी एस. ( IAS:RR:२०१५) जिल्हाधिकारी, वाशिम यांची महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
योगेश कुंभेजकर ( IAS:RR:२०१६) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला यांची वाशिम येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
श्रीमती वर्षा मीना ( IAS:RR:२०१८) यांची अकोला येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बदल्या झालेल्या नव्या अधिकाऱ्यांना आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी रुजू हा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
