अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
खाकी वर्दींतला देव माणूस, वाईचे डीवाय एसपी बाळासाहेब भालचिम यांना राष्ट्रपती पदक सन्मानित
संगीता इनकर सातारा जिल्हा प्रतिनिधी
अभिनंदन तर झालेच पाहिजे ना, जो तळागाळापासून काम करतो त्याचं कौतुक त्यांचं अभिनंदन हे नक्कीच झालं पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवा..!! सातारा वाईंचे कर्तव्यदक्ष डीवाय एसपी पोलीस उपाधीक्षक आदरणीय बाळासाहेब भालचिंम यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. उत्कृंष्ट कामगिरीबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. वाई विभागांचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना प्रदीर्घ सेवेमध्ये केलेल्या गुणवत्तापूर्ण उत्कृंष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. बाळासाहेब भालचिम हे मागील सव्वा दोन वर्षापासून वाई येथे पोलीस उपाधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर शहर,नांदेड,सोलापूर मुंबई,कोल्हापूर शहर व सातारा जिल्ह्यातही आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण उत्कृंष्ट कामकाज केले आहे. त्यांनी तपास केलेले गुन्हे आणि दाखल केलेले दोषारोप पत्र, न्यायालयात सिद्ध होऊन अनेक गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे. त्यांच्या कामाची पद्धत नेहमी वेगळी राहिली, आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करून बरोबर घेवुन जाण्याची त्यांची कामाची शैली आहे. तपास कामातही त्यांचा चांगलाच हातखंड होता. त्यांच्या विविध जिल्ह्यातील केलेल्या उत्कृंष्ट कामगिरीमुळे यापूर्वीही त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलीस पदक, पोलीस महासंचालकांचे पदक आणि आता राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यांचे सातारा जिल्हा पोलिस दलातून तसेच सर्वांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. आदरणीय साहेबांचे रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडूंन हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा आहेत.
