अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
माळेगाव पोलिसांनी चोरी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुस्क्या
प्रतिनिधी आदित्य चव्हाण
हॉटेल कामगारांनी केली मालकाची चोरी करून पळून चालले गावी, माळेगांव पोलिसांनी आरोपींची स्वारी आणली पोलीस स्टेशनच्या दारी
माळेगांव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील मौजे पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे या गावचे हददीतील हॉटेल अमित चे यातील फिर्यादी/हॉटेल मालक श्री.अमित उदयसिंह जगताप वय 39 वर्ष, धंदा – हॉटेल व्यवसायिक, रा. नागेश्वरनगर, माळेगांव बु ता.बारामती जि.पुणे यांनी दिनांक 15/08/2025 रोजीचे रात्रौ 11.00 वा.चे सुमारास हॉटेल अमित रात्रौ विहित बंद करून घरी गेलेनंतर ते दिनांक 16/08/2025 रोजी पहाटे 05/00 वा. चे. दरम्यान हॉटेल कामगार म्हणून काम करणारे 1) सुरज रामनरेश वर्मा 2) विकास बाधम (पुर्ण नाव माहित नाही) दोघे रा.डंडनियापुरा ता.फातियाबाद जि.आग्रा राज्य उत्तर प्रदेश यांनी संगनमताने
1) 40,000/- रू किंमतीची सुझुकी कंपनीची पांढरे रंगाची ऑक्सिस स्कुटी गाडी नं एम.एच 42 बी.सी 7806 जु.वा. कि.अं
2) 20,000/- रू किंमतीचे लॅपकेअर कंपनीचा
काळे रंगाचा कॅम्प्युटर त्याचा सी.पी.ओ..
किबोर्ड, जु.वा.कि.अं
3) 10,000/- रू किमतीचा काळे रंगाचा ईपसन कंपनीचा प्रिंटर जु. वा. किं. अं
4) 4000/- रू किमतीचा पांढरे रंगाचा वरपुल कंपनीचा ओवन जु. वा. किं. अं
5) 4000/- रू किंमतीचा पांढरे रंगाचा सुजाता कंपनीचा मिक्सर जु.था. किं. अं
6) 8000/- रू किमतीचा स्टिलचा सेन्डवीज पिलर जु.वा. किं.अं
7) 3000/- रू किमतीचा एरटेल कंपनीचा पांढरे रंगाचा वायफाय मशीन जु. वा. कि.अं
असा एकूण रक्कम 89000/ – जु.वा.किं.अं. रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेलेची तक्रार
हॉटेल मालक श्री.अमित उदयसिंह जगताप यांनी माळेगांव पोलीस ठाणे येथे दिल्याने माळेगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 209/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 306, 3 (5) या प्रमाणे गुन्हा दाखल झालेनंतर माळेगांव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी स.पो.नि.सचिन लोखंडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शोध पथकास आरोपी तसेच चोरीस गेले मुद्देमालाचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने गुन्हे शोध पथकाने आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याने ते मूळगावी पळून जाण्याची शक्यता जास्त असल्याने माळेगांव पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सदर गुन्ह्याचे घटनास्थळ ठिकाणचे सी.सी.टी.व्ही चे आधारे यातील आरोपी क्रमांक 1 व 2 हे रेल्वेने दौंड येथून मनमाड मार्ग उत्तर प्रदेश असे जात असताना मुद्देमालासह मनमाड रेल्वे स्टेशन येथे ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याचे अटक केलेली आहे
सदरची कामगिरी मा.श्री.संदीपसिंह गिल्ल सो (पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण) मा.श्री.गणेश बिरादार सो, (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग), मा.डाँ.श्री.सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग यांचे मार्गदर्शनाखाली माळेगाव पोलीस स्टेशन प्रभारी स.पो.नि.सचिन लोखंडे सो तसेच पोलीस हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर मोरे,अमोल राऊत,अमोल कोकरे यांनी केलेली आहे.
