अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
महायुती सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांची लवकरच लवकर पक्षातून हकालपट्टि करा.
प्रतिनिधी मुकूंद मोरे
महायुती सरकारमधल्या कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करुन महाराष्ट्राची होत असलेली बदनामी थांबवावी, ह्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे घेण्यात आलेल्या राज्यव्यापी महाराष्ट्र जनआक्रोश आंदोलनात पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी भ्रष्ट महायुती सरकारला धारेवर धरले. ह्यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते आमदार ॲड. अनिल परब, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, शिवसेना नेते आमदार सुनिल प्रभू तसेच शिवसेना उपनेते, सचिव, आमदार, विभागप्रमुख आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
