अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात रा.ति.काबरे विद्यालय एरंडोलचे यश
प्रतिनिधि….स्वप्निल पाटील एरंडोल.
क्वांटम युगाची सुरुवात संभाव्यता व आव्हाने या विषयाच्या अनुषंगाने तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता विद्यार्थ्यांनी पोस्टर ,पीपीटी प्रेझेंटेशन च्या माध्यमातून वैज्ञानिक माहिती दिलेल्या कालावधीत पूर्णपणे मांडला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री राजेंद्र महाजन, तालुका समन्वयक श्री अमोल वाणी ,सह समन्वयक समिता पाटील आदी उपस्थित होते. रा ति. काबरे विद्यालयातील *कु.वैष्णवी राजू महाजन ह्या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक* मिळविला त्याबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी काबरे, शाळेचे मुख्याध्यापक.श्री.सुनील राठी उपमुख्याध्यापक श्री प्रदीप नेटके पर्यवेक्षक श्री प्रदीप नारखेडे यांनी विद्यार्थिनीचा सत्कार केला. याप्रसंगी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
