अतिशय दुःखद घटना – मनाला वेदना देणारा प्रसंग
प्रतिनिधी मुकूंद मोरे
केतकीपाडा नवतरुण मित्र मंडळाच्या दहीहंडी सरावादरम्यान केवळ अकरा वर्षांचा महेश रमेश जाधव हा चिमुकला आपल्यातून कायमचा निघून गेला, ही अत्यंत वेदनादायी घटना आहे.
या दुःखाच्या प्रसंगी, महेशच्या कुटुंबाच्या सोबत उभे राहत, शिवसेना विभागप्रमुख श्री. उदेश पाटेकर साहेब तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने ₹ 1,00,000/- इतकी आर्थिक मदत देण्यात आली.
या मदतीतून महेशच्या कुटुंबाला थोडासा आधार मिळावा आणि या कठीण काळातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली
