अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील मंत्र्यांच्या वापराच्या गाडीचा विमा संपून ७८३ दिवस झाले ,तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या गाडीचा वार्षिक टॅक्स दीड महिन्यापासून थकीत आरटीओ झोपा घेत आहे का?
नांदेड विशेष प्रतिनिधि सखाराम कुलकर्णी
नांदेड जिल्ह्यासह राज्यात उच्चपदस्थ असलेले आय.ए.एस अधिकाऱ्यांनी भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांचे प्रचंड वादग्रस्त प्रकरण आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मध्ये मंत्री महोदयांना वापरण्यास असलेल्या वाहनाचा विमा संपून ७८३ दिवस झालेत. तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या गाडीचा वार्षिक टॅक्स दीड महिन्यापासून थकीत, तर विमा संपून पंधरा दिवस झालेत. याची तक्रार जागरूक जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी परिवहन आयुक्त मुंबई तसेच आरटीओ नांदेड ला दि ०५ ऑगस्ट ला केली. पण परिवहन खाते झोपेतच आहे असे दिसते.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांना शासनाने सरकारी वाहन दिलेले असते. पण काही अधिकाऱ्यांना शासनाने दिलेले वाहन आवडत नाही. म्हणून ते चोर मार्गाने, टेंडर न बोलावता शासनाची परवानगी न घेता आलिशान भक्कम किरायचे भाडेतत्त्वावर वाहन घेतात व शासनाला चुना लावतात. या वाहनांचे भाडे रोज तीन हजार रुपयांच्या जवळपास असते. अशा भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनावर वाहन मालक लाल अक्षरात महाराष्ट्र शासन असे लिहितो.याचा भाडेकरार संपल्यावरही हे महाराष्ट्र शासन लिहिलेले तसेच असते. यातून या वाहनाचा काही गैरवापर होऊ शकतो. याची तक्रार सखाराम कुलकर्णी यांनी प्रधान सचिव मंत्रालय मुंबई यांच्याकडे केली आहे. पण शासनाला अद्याप जाग आली नाही. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील मंत्र्याच्या वापरासाठी असलेली एम. एच. २६ बी. सी. ५४५० या वाहनावर लाल रंगात महाराष्ट्र शासन व वर्तुळात एम असे लिहिलेले आहे. पण या वाहनाचा विमा संपून ७८३ दिवस झाले. व पियुसिसि प्रमाणपत्र बाद होउन ४ वर्ष ७ महिने १४ दिवस झाले.हे वाहन महत्त्वाचे असून मंत्र्यांच्या ताफ्यात असते. जर या वाहनाचा अपघात झाला, कोणाला काही दुखापत झाली तर कोण जिम्मेदार. हा प्रश्न आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड या वापरत असलेले एम. एच. 26 सी. एच.७२०९ हे वाहन वादग्रस्त असून या वाहन धारकांन नंबर प्लेट मध्ये छेडछाड करून जवळपास २ वर्ष सदरील वाहन वापरले. आता या वाहनाचा वार्षिक कर दीड महिन्यापासून थकीत आहे. विमा संपून २५ दिवस झालेत. फिटनेस प्रमाणपत्र संपले. पीयूसीसी प्रमाणपत्र संपले. हे वादग्रस्त असलेले वाहन मुख्य कार्यकारी अधिकारी का वापरतात ही चर्चा होत आहे. याबाबतची तक्रार जागरूक ज्येष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी ईमेलद्वारे परिवहन आयुक्त मुंबई, प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड, जिल्हाधिकारी नांदेड व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांचेकडे दि.०५ ऑगस्ट ला केली आहे. पण या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना यांचे काहीही गांभीर्य दिसून येत नाही. ही खेदाची बाब आहे. जर या वाहनाचा अपघात झाला तर कोण जिम्मेदार हा प्रश्न समोर येतो.
