अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
१५ ऑगस्ट रोजी स्मृतिगंध साप्ताहिकाचे प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
उद्घाटक म्हणुन पालकमंत्री मेघना साकोरे/बोर्डीकर तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार राजेश विटेकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती व पुरस्कारांचेही होणार वितरण
पाथरी(प्रतिनिधी)
पाथरी येथून नव्यानेच सुरू होणाऱ्या साप्ताहिक स्मृतीगंध या साप्ताहिक वर्तमानपत्राच्या प्रथम अंकाचे प्रकाशन १५ ऑगस्ट २०२५ रोजी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तसेच महिला बाल विकास राज्यमंत्री ना. मेघनादीदी साकोरे/ बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा विटेकर हे राहणार आहेत. या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजता पाथरी बस स्थानकाच्या मागे हॉटेल सिटी प्राईड येथे संपन्न होणाऱ्या या प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास आमदार राहुल पाटील,आमदार रत्नाकरराव गुट्टे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, पाथरी मतदारसंघाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, माजी आमदार विजयराव भांबळे, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण ,तहसीलदार एस.एन.हन्देश्वर, बीव्हीजी ग्रुपचे मॅनेजर सुदर्शन भालेराव, संभाजीनगरचे चैतन्य भराडे, पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांची विषेश उपस्थित राहणार आहे.
याबरोबरच शिक्षण व आरोग्य सभापती दादासाहेब टेंगशे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, जिल्हा परिषद सदस्य माणिक आप्पा घुमरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दत्ताभाऊ मायंदळे, शिक्षण सभापती भावनाताई नखाते, भाजपा जिल्हाप्रमुख सुरेश भुमरे, शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, सधद्धमम सेवासंघाचे अध्यक्ष सदाशिव भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार रानबा गायकवाड, कवी, निवेदक बालाजी कांबळे, योगेश्वरी साखर कारखान्याचे संचालक रोहित भैया देशमुख, भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य शिवराज नाईक, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक प्रेरणाताई वरपुडकर, युवा नेते श्रीकांत भैया विटेकर, शिवसेना तालुकाप्रमुख मुजाभाऊ कोल्हे, भाजपा तालुका अध्यक्ष स्वराज भुमरे, माजी नगराध्यक्ष नगरपरिषद पाथरी जुनेद भैया दुरानी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अजिंक्य भैय्या नखाते, माजी नगराध्यक्ष मानवत डाॅ. अंकुश लाड, सोनपेठ चे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, पंचायत समिती पाथरी चे सभापती राजेश ढगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्याम धर्मे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वनाथ थोरे, जीवन हॉस्पिटल परभणीचे जगदीश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संदीप भैय्या टेंगशे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णू काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
याच कार्यक्रमात विविध क्षेत्रातील गुणवंतांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पाथरी शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संपादक लक्ष्मण उजगरे कार्यकारी संपादक धम्मपाल उजगरे, अपेक्स अकॅडमी पाथरीचे संचालक अनिल उजगरे यांनी केले
