अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
मुंबई मराठी पत्रकार संघात नाटकाची तिसरी घंटा वाजणार
प्रतिनिधी लव क्षीरसागर मुंबई
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आजपासून नाटकाची तिसरी घंटा वाजणार आहे.असं पत्रकार संघाने एकमताने जाहीर केले.
आज शुक्रवारी २५ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ” मी भारतीय ” प्रयोग सहा वाजता करण्यात आला.
महाराष्ट्रातील प्रायोगिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘नाट्य शुक्रवार’ या अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
आज ” मी भारतीय ” या दीर्घाॅंक नाट्यानें पहिली नाट्यकृती सादर करण्यात आली.
लेखक,अभिनेते,रविंद्र देवधर यांनी दिग्दर्शित केलेल्या
” मी भारतीय” या दिर्घांकाचे सादरीकरण मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या सभागृहात हाउसफुल्ल गर्दीत करण्यात आले.
बऱ्याच पत्रकार व नाट्यरसिकांनीं प्रयोगाचा पुर्णता मोफत लाभ घेतला . अभिनेते अरुण नलावडे सरांनी असे प्रायोगिक रंगभुमिवरील या नाट्यकृतीचे प्रयोग होणं गरजेचं आहे. आणि अशा प्रयोगाचे कौतुक करण्यासाठी आपण सगळ्यांना निमंत्रण देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसार केला पाहिजे.
रवींद्र देवधर यांनी
” मी भारतीय ” ही फक्त नाट्यकृती नसून एक देशभावना जनमानसात रुजविण्यासाठीची चळवळ आहे.आणि प्रत्येकाला ती पाहता यावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. असेच समाजाने ही पुढाकार घेतला पाहिजे ही अपेक्षा आहे.
” मी भारतीय ” दीर्घाॅंक प्रयोगात अभिनेते रवींद्र देवधर यांच्या समवेत अभिनेते ऋषिकेश कानडे यांची महत्वाची भूमिका साकारली आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन पत्रकार नयना रहाळकर यांनी उत्तमरित्या सांभाळले.
