छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर लालबावटा शेतकरी युनियनच्या वतीने निदर्शने
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आज महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियनच्या वतीने निदर्शने करून जिल्हाधिकारी संभाजीनगर यांचा 17 जुलै 2025 चा अतिक्रमित गायरान जमिनी निष्काशीत करण्याच्या जीआरची होळी करून तो रद्द करावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी.यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
यासाठी गंगापूर, फुलंब्री, सिल्लोड, छ,संभाजीनगर, वैजापूर, सोयगाव आदी तालुक्यातून गायरान जमीन धारक उपस्थित होते.
प्रमुख उपस्थितीत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड राम बाहेती, जिल्हा सचिव कॉम्रेड गणेश कजबे, कॉ. हरिभाऊ हटकर, सिल्लोड तालुका सचिव कॉम्रेड असलम मिर्झा, कॉ. संजय तावरे, गयाबाई सोनवणे, नरसिंग कोकाटे, गणेश सुसे, संतोष काळे, शेख नूर, रुक्मणबाई श्रीखंडे, रघुनाथ खंडागळे, संतोष मोरे, पत्रकार राजू साठे, काशिनाथ कुकलारे आदींची उपस्थिती होती
