पंढरपूर विकास चोरी नव्हे, काहीही लपून- जपून होणार नाही:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट मत..!!
कलावती गवळी (सोलापूर जिल्हा ) प्रतिनिधी
श्री. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी कोट्यावधी लोक पंढरपुरांत येतात त्याची अव्यवस्था होत हे योग्य नाही आपल्याला कोणताही विनाश करून कॉरिडॉर करायचा नाही परंतु पंढरपूरचा विकास करणे म्हणजे चोरी नाही कोणतीही गोष्ट लपून-छपून केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरांत आले होते त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की ज्यांच्या दुकानांवर घरावर कॉरिडॉरमुळे कारवाई करावी लागेल त्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी समाविष्ट करून घेण्यात येईल कोणाचेही नुकसान होणार नाही सर्वांना समाविष्ट करून सोबत घेवुनच आपल्याला विकास करायचा आहे. ज्यावेळी लोकांमध्ये जाऊ त्यावेळी आम्हांला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यावेळी सांगितले, पण पंढरपूरचा विकास हा लपून-छपून होणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे.
