पुणे उपजिल्हाधिकारी तथा (उपजिल्हा निवडणूक अधिकारी ) मीनल कळसकर यांची पुरीगोसावी सातारकरांनी घेतली सदिंच्छा भेट…
कर्तव्यदक्ष,शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून ओळख..!!
कलावती गवळी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी
शासकीय नोकरी म्हणजे कायद्याच्या चौकटीत लोकांच्या हिंताचे काम करण्याची मिळालेली संधी लोकांच्या अडचणी दूर करताना सर्वच कामे नियमानुसार करता येत नाहीत. परंतु मुखात सरस्वती ठेवत नागरिकांचे समाधान करणे व प्रसंगी दुर्गा होत कठोर निर्णय घेणारी अधिकारी म्हणून सौ. मीनल कळसकर यांनी महसूल विभागात चांगलाच ठसा उमटविला आहे. आज रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सातारच्या संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांची सदिंच्छा भेट घेतली… यावेळी महाबळेश्वर या ठिकाणी पहिल्यांदाच तहसीलदार म्हणून काम केल्याचे त्यांना आठवण झाली. सौ.मीनल विवेक कळसकर यांनी लहानपणीच सरकारी अधिकारी व्हायचं ठरविले होते. त्यामुळे त्या दृष्टीनेच वाटचाल केली. जिद्द आणि मेहनत घेतली त्या म्हणाल्या की आई-वडिलांकडून नेहमीच प्रेरणा मिळाली बाबांतर परीक्षेच्या वेळी केंद्र आणि कक्ष शोधून देत होते. शासकीय नोकरीत प्रवेश केला आई-वडिलांच्या प्रेरणेची जोड मिळाल्याने मला हे अवघड शिंखर गाठता आले अधिकारी म्हणून काम करताना अडचणी येतच असतात. मात्र त्यांतून मार्ग काढीत समाजोपयोगी काम करताना आनंद असल्याचे त्यांचे मत आहे. आणि महिला कोणत्या क्षेत्रात पुरुषांच्या मागे नाहीत किंबहुना त्या आघाडीवर आहेत. असे म्हणणे काय वावगे ठरणार नाही. महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. या महसूल विभागात मोठ्या संख्येने महिला आहेत नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाची धुराही महिलांच्या खांद्यावर आहे. जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी निवडणूक विभागांच्या उपजिल्हाधिकारी महिलाच अधिकारी आहेत. सौ. मीनल विवेक कळसकर या उपजिल्हाधिकारी असून निवडणूक विभागांच्या उप निवडणूक अधिकारी पुणे शहरांतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले उच्च शिक्षणही तिथूनच पूर्ण केले आणि सन 2000 मध्ये स्पर्धा परीक्षा पास करीत नायब तहसीलदार पदी 2011 मध्ये नियुक्ती मिळाली होती. पुणे जिल्ह्यात नायब तहसीलदार म्हणून विविध पदांवर काम केले. त्यानंतर तहसीलदार पदी नियुक्ती मिळाली होती. 2011 मध्ये उपजिल्हाधिकारी पदी बढती मिळाली व नागपूरला रुजू झाल्या होत्या. गरीब अडचणीतील गरजूंची कामे केल्याचे समाधान आहे. काम झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान मिळते माझ्या कुटुंबातील व्यक्ती प्रमाणेच इतरांचे काम करण्याचा माझा प्रयत्न कायम ठेवला आहे. कामाचा ताण घरापर्यंत कधीच येऊ देत नाही महिलांनी या क्षेत्रात यावे नक्कीच आलं पाहिजे असं मला वाटतं… त्यानंतर विशेष म्हणजे महाबळेश्वरला पहिली महिला तहसीलदार होण्याचा मानही त्यांना मिळाल्याचे मीनल कळसकर यांनी सांगितलं आहे. सौ. मीनल विवेक कळसकर सध्या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी तथा ( जिल्हा निवडणूक अधिकारी ) म्हणून काम पाहत आहेत कर्तव्यदक्ष, अन् शिस्तप्रिय महिला अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते.
