अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
प्रतिनिधी गणेश तारु
वीर जिवाजी महाले यांचे कार्य समाजाला आदर्श प्रेरणास्रोत-गणेश बिडकर
प्रतापगडावरील रणसंग्रामाच्या वेळी छत्रपती शिवरायांच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी आपले अनमोल योगदान देणारे शूरवीर जिवाजी महाले यांचे कार्य सर्व समाजाला आदर्श प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन पुढे मनपाचे माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांनी केले. बारा बलुतेदार समाज विकास संघ आणि सकल नाभिक समाज यांच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. रास्ता पेठ येथील वीर शिवाजी महाले स्मारकाचे रंगकाम आणि प्रकाश योजनेचे काम लोकार्पण करण्याचा कार्यक्रम गणेश बिडकर यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत पूजन करीत तसेच नारळ वाढवत संपन्न झाला
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारा बलुतेदार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी होते. यावेळी व्यासपीठावर माथेरानचे नगरसेवक आकाश चौधरी,सौ अनिता गणेश वाळुंजकर, प्रदेश सचिव राजेंद्र पंडित,प्रभारी शहराध्यक्ष सुनील शिंदे,उपाध्यक्ष उदय दैठणकर विनायक लांबे, प्रमुख व समान वेळेत हेमंत श्रीखंडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांचा सन्मान गणेश बिडकर व रामदास सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती व शाल,गुलाबपुष्प देऊन संपन्न झाला. याप्रसंगी रामदास सूर्यवंशी यांनी वीर जिवाजी महाले,वीर भाई कोतवाल आणि वीर शिवाजी काशीद यांच्या स्मारकासाठी पुणे मनपातर्फे भरीव निधी देण्याची मागणी केली. तसेच भोर येथील कारी येथे होणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली. प्रतापगडावर होणाऱ्या स्मारकामध्ये वीर जिवाजी महाले यांचे स्वतंत्र दालन उभे करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उदय दैठणकर यांनी नाभिक व बारा बलुतेदार समाजाला आगामी निवडणुकीत संधी भाजपासह सर्व राजकीय पक्षांनी दिली पाहिजे कारण या समाजांतील कार्यकर्त्यांना राजकीय प्रवाहात आणल्याशिवाय त्या त्या समाजाचा विकास करताना त्यांचा सहभाग त्यामध्ये असेल व त्यातून सर्वांगीण विकास साधला जाईल असे ते शेवटी म्हणाले.
पुणे मनपा विद्युत विभागाचे सुनील कांबळे यांचाही प्रकाश योजना सुरु केल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय दैठणकर,हेमंत श्रीखंडे,राजेंद्र पंडित,सुनील शिंदे,परशुराम काशीद,विनायक गायकवाड,प्रशांत गायकवाड,सुजीत मगर,रवींद्र मावडीकर,राजू माटे,विनोद माटे,सुजीत पुजारी, प्रशांत वाणी,उदय तुपे, संदीप दळवी,सोहंम सूर्यवंशी,अमोल थोरात, किशोर पवार,बबनराव काशीद,बाळासाहेब भामरे,वसंत गाडेकर,गोविंद वाघमारे, अशोक चटपल्ली, तुकाराम दैठणकर,गणेश दैठणकर,रवींद्र राऊत,राजेश आढाव,निलेश चटपल्ली, हनुमंत यादव, सूर्यकांत भोसले,लियाकत महाजन,गणेश आहेर,रवींद्र ननावरे,चारुदत शिंदे,मेजर सईद अन्सारी, रमेश पायगुडे,अनिल जाधव,संजय पाचेरकर,दत्ताभाऊ पाकिरे,महेंद्र गायकवाड,बालाजी तिरमकदार,जितेंद्र जाधव,सुरेंद्र तावरे, रोहित यवतकर,नाना आढाव,आदित्य दैठणकर,अपेक्षा राऊत,विवेक नायडू,ओंकार जोशी,भाऊ पवार,नागेश कोकाटे, नितीन दैठणकर,राहुल आढाव,संदीप जांभळे,वसंत ढवळे, नेताजी काशीद,प्रवीण दैठणकर,श्याम काशीद,सौ.नीता दैठणकर,राजकुमार राव, नुरायन सलमानी,सौ.रोहिणी दैठणकर,सुरेश गायकवाड सौ.नीलम दैठणकर,निलेश चातुर,सौ.रेश्मा दैठणकर,दिलीप शाह, सुरेश नाईक,सौ.केतकी दैठणकर,सचिन दळवी, प्रकाश राणे यांच्यासह अनेकांनी यशस्वी प्रयत्न केले.यावेळी महिलांनी सुरवातीला औक्षण केले. महिलांची उपस्थिती मोठी होती.
कार्यक्रमाचे पाहुण्यांचा परिचय सुनील शिंदे अन त्यांचे स्वागत उदय दैठणकर,अध्यक्षीय मनोगत रामदास सूर्यवंशी व सुंदर सूत्रसंचालन रवींद्र राऊत तर आभार हेमंत श्रीखंडे यांनी मानले.
