पुण्यात घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या आवळल्या मुसक्या, पुणे शहर समर्थ पोलिसांची दमदार कामगिरी..!!
स्नेहल तांबोळी ( पुणे शहर ) प्रतिनिधी
पुणे शहरांतील नाना पेठेतील दुकानाचे शटर वाकवून दुकानातील टेबलच्या डावरमध्ये ठेवलेले पैसे चोरून नेणाऱ्या आरोपींच्या अवघ्या चार तासांत समर्थ पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले आहे. सुजल राजन परदेशी (वय 20) सुभाष राजेश सरोज (वय 21) नितीन दिलीप सरोज (वय 21) रोहित मुन्नालाल सरोज (वय 22) सर्व रा. शिवाजी आखाड्यासमोर मंगळवार पेठ पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. चौघेही मूळचे उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत.
याबाबत अरीफ पठाण (वय 55 ) रा. हडपसर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्याचे वरिष्ठ प्रभारी अधिकारी उत्तम गित्ते यांनी आपल्या पोलीस ठाणेकडील तपासी अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तपासाची चक्रे गतिमान करत समर्थ पोलीस ठाणेचे तपासी अधिकारी अखेर चोरट्यांपर्यंत पोहोचले चौघांनाही ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी मौजमजेसाठी चोरीची कबुली चोरी केल्याचे सांगितले, गुन्ह्यातील चोरी केलेली रक्कम हस्तगत करण्यात आले आहे. सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे पोलीस आयुक्त कृषिकेश रावले सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम गित्ते पोलीस निरीक्षक ( गुन्हे) चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे पोलीस अंमलदार पागार रोहिदास वाघेरे इम्रान शेख औचरे शिवा कांबळे अमोल गावडे शरद घोरपडे भाग्येश यादव आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.
