मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ व कलानिधी समिती
आयोजित पाऊले चालती
वाद्यवृंद गुणगौरव सोहळा 2025
ज्या कलावंतांनी आपल्या कलेची सुरुवात वाद्यवृंदातून करत.. पुढे जाऊन आपल्या कलेद्वारे मुशाफिरी करत नाटक -चित्रपटात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल.. यंदाच्या या सोहळ्यात मला “विशेष कलागौरव पुरस्कार 2025” देऊन माझ्या पाठीवर शाब्बासकिची थाप दिली… आणि तीही पद्मश्री अनुपजी जलोटा यांच्या हस्ते व तेही दिग्गज माननीय सुदेशजी भोसले यांच्या उपस्थितीत… आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विठूरायाच्या “आषाढी एकादशीच्या दिनी “… धन्य झालो… मानाच्या “चौरंग” सारख्या संस्थेच्या “मंगलगाणी दंगलगाणी” पासून सुरु झालेला प्रवास…अभिनयाद्वारे नाटके.. सिनेमे करत… आता अभिनयासोबत नाटकाचं दिग्दर्शन करत… पुढे जाऊन सिनेमाचं दिग्दर्शन करत हा अखंड प्रवास चालू ठेवण्यास… या पुरस्कारने आणखीनच बळ दिलंय.. पांडुरंगाचा कृपाआशीर्वाद आणि आपल्या सारख्या मायबाप रसिकांचं अपार प्रेम असेल तर अशक्य असं काहीच नाही!
सध्या जोरदार चर्चेत असेलेलं मी दिग्दर्शित केललं सस्पेन्सफुल अफलातून कॉमेडी नाटक
” व्वा काय प्लॅन!!” नक्की बघायला या!
#award #kalakar #achievement #wahkayplan #blessings #kalagaurav #actorslife #theater #rangmanch #marathiactor #sanjaykhapare
