अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
आयपीएस कल्पना बारवकर सांगलीच्या नव्या अप्पर पोलीस अधीक्षक सांगली जिल्ह्यात चौथ्यांदा महिला आयपीएस अधिकारी
संभाजी पुरीगोसावी ( सांगली जिल्हा ) प्रतिनिधी
सांगली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून रितू खोकर यांची धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून गेल्या काही दिवसांपासून सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक पद चांगलेच रिक्त होते. मात्र शुक्रवारी झालेल्या बदल्यांमध्ये अमरावती शहरांत पोलीस उपायुक्त (मुख्यालय) म्हणून या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आयपीएस अधिकारी कल्पना बारवकर यांची सांगली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी पोलीस अधीक्षक नांदेड परिक्षेत्र पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज दौंड येथे प्राचार्य म्हणून काम पाहिले आहे, त्यांनी आतापर्यंत विविध पदांवर काम करताना अनेक यशस्वी कामगिरी केल्या आहेत. कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना चांगलेच ओळखले जाते लवकरच सांगली जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आयपीएस अधिकारी कल्पना बारवकर या चौथ्यांदा महिला अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून लाभल्या आहेत. सांगली अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून यापूर्वीही मनीषा दुबळे,आँचल दलाल डूडी,रितू खोकर याही महिला आयपीएस अधिकाऱ्यांनी उत्कृंष्ट सेवा दिली.
