एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

“कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते” – विक्रांत मोरे

“कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते” – विक्रांत मोरे

प्रतिनिधी: सारंग महाजन.

अहिल्यानगर – सीबीएसई दहावी परीक्षेत ९८% गुण मिळवणाऱ्या वेदिका गणेश राऊत हिचा स्नेहबंध सोशल फाउंडेशन च्या वतीने गौरव करण्यात आला. या सत्कार प्रसंगी भिंगार छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे आणि स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी तिचे कौतुक केले.

वेदिका राऊत हिने तक्षशिला स्कूल, भिंगार येथून शिक्षण घेत सीबीएसई बोर्डात दहावीत ९८% गुण मिळवले.

तिच्या मेहनतीला आणि चिकाटीला गौरव म्हणून सन्मानपत्र, पदक, गुलाबपुष्प आणि पेढा देऊन सत्कार करण्यात आला.

सत्कार सोहळ्यात आई अर्चना राऊत आणि वडील गणेश राऊत उपस्थित होते.

विक्रांत मोरे यांनी वेदिकेच्या यशाचे कौतुक करत, “कष्टाची तयारी ठेवल्यास आयुष्यात काहीही अशक्य नसते,” असे वक्तव्य केले.

डॉ. उद्धव शिंदे यांनी वेदिकेच्या सातत्यपूर्ण अभ्यासाची प्रशंसा केली आणि तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

> दहावीत ९८ टक्के मिळवणाऱ्या वेदिका राऊत चा सत्कार करताना छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, ‘स्नेहबंध’चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे. समवेत गणेश राऊत, अर्चना राऊत.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link