एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेऊन विकास पर्व सुरु करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री

गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेऊन विकास पर्व सुरु करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री

कार्यकारी संपादक किरण सोनवणे

मुख्यमंत्री जिल्हाविकासाकडे दुर्लक्ष करतात हा काँग्रेसचा आरोप केविलवाणा – भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ देवराव होळी*

 

*मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्हा विकासाकडे दुर्लक्ष करतात असा आरोप करून काँग्रेस सहा जून रोजी महायज्ञ करणार आहे हा काँग्रेसचा एकप्रकारचा थोतांडपणा असून जिल्ह्याच्या विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जे विकास पर्व सुरु केले ते काँग्रेसच्या पचनी पडले नसल्याने ते असा केविलवाणा व हास्यास्पद प्रकार करीत असल्याचा टोला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी लगावला*.

*गडचिरोली जिल्ह्याच्या विकासावर मुख्यमंत्र्याचे बारीक लक्ष असून जिल्ह्याला विकासाच्या उंचीवर नेण्यासाठी इथल्या साधनसंपत्तीचा वापर करून जिल्हयातील जनतेची आर्थिक प्रगती करून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले. जिल्ह्याचा मागासलेपणाचा कलंक पुसून टाकण्यासाठी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद केली. मी आमदार असताना जिल्ह्याच्या इतिहासात कधी नव्हे तेवढा विकास निधी मंजूर केला. त्यामुळेच जिल्ह्यात विकासाचे एक नवे पर्व सुरु केले. जिल्ह्यातील दूर्गम भागतील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा व्हावी यासाठी त्यांनी मेडीकल कॉलेजला मंजुरी दिली, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोलीला मेडीकल कॉलेजची मंजुरी देताना आडकाठी आणल्या गेली. जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करण्यासाठी कोटगल, बॅरेज , वसा पोर्ला सिंचन उपसा प्रकल्प मंजूर केले. गडचिरोलीत रेल्वे च्या कामात गतिशीलता आणण्याचे काम त्यांनी केले,गडचिरोली विद्यापीठाच्या विकासासाठी भरघोस निधी त्यांनी मंजूर केला. गडचिरोलीत विमानतळ होणार आहे या अर्थसंकल्पात त्यांनी जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी 500 कोटींचा निधी मंजूर केला यावरून जिल्ह्याच्या मूलभूत विकासासाठी त्यांची असलेली तळमळ दिसून येते. जिल्ह्यात काही प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी रोडमॅप तयार केला. जिल्हयातील विवीध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाला ॲक्शन मोडवर आणले. हिस्त्र प्राण्यांच्या हल्ले रोखण्यासाठी त्यांनी युद्धपातळीवर उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या त्यावर काम सुरु आहे. इथल्या आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी त्यांनी मोठया प्रमाणात निधी मंजूर केला.गडचिरोली जिल्ह्यात उद्योगविषयी पोषक वातावरण निर्मितीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी मला उद्योग क्रांती यात्रा काढण्यास सांगितले.व मी संपूर्ण गडचिरोली जिल्हयात उद्योगयात्रा काढली त्यामुळे जिल्ह्यात उद्योगक्रांती चे वारे वाहू लागले व गडचिरोली जिल्ह्यात उद्योग येण्यास सुरुवात झाली याचे श्रेय देवेंद्र जींना आहे त्यामुळेच जिल्हयात रोजगार मोठया प्रमाणात उपलब्ध झाला. गडचिरोली जिल्ह्याची ओळख आता स्टील हब म्हणून होणार आहे. मोठ्या उद्योगपतींनी जिल्हयात गुंतवणुकी लाठी विशेष स्वारस्य दाखवले ते केवळ मुख्यमंत्र्याच्या कणखर नेतृत्वामुळेच. मात्र काँग्रेसने पिवळा चष्मा घातला असल्याने त्यांना सर्वच पिवळे दिसते. आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हा विकासाकडे पूर्ण लक्ष आहे मात्र ते मुख्यमंत्री असल्याने त्यांचा कामाचा व्याप मोठा आहे यासाठीच त्यांनी जिल्ह्याच्या विकास कार्यात कोणताही अडथळा येवु नये, यासाठी नियोजनविषयक बाबीचा आढावा घेण्यासाठी सहपालकमंत्री नियुक्त केले. ते जिल्ह्याला वेळोवेळी भेटी देवून इथल्या नागरिकांच्या समस्यांबाबत ईथल्या विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती देवून जिल्ह्याचा जलदगतीने विकास व्हावा यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करत असतात. तरीही मुख्यमंत्र्याच्या पालकत्वावरुन काँगेसने जे काही प्रश्न उपस्थित केले ते तथ्यहीन आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतेही प्रयत्न झाले नाही.विकासकामांचा निधी मंजूर करताना नेहमीच त्यांनी गडचिरोली जिल्ह्यावर अन्याय केला इथले मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने दुर्लक्ष केले आता गडचिरोली जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत असल्याचे पाहून काँग्रेसच्या पोटात दुखत आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेऊन येथील जनतेच्या कल्याणासाठी तळमळीने काम करणारे जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणणारे विकासाभिमुख नेतृत्व मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असुन काँग्रेसचा महायज्ञ महाफसवा आहे. लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी जे निर्णय केले ज्या विकास योजना अमलात आणल्या त्या जिल्हयातील जनतेच्या डोळ्यासमोर असून काँग्रेसच्या खोटारडेपणावर जिल्हयातील जनता कदापिही विश्वास ठेवणार नाही असे सांगत काँग्रेस सरकारच्या काळात मागास जिल्हा अशी ओळख असलेला गडचिरोली जिल्हा भाजप, महायुतीच्या सरकारच्या काळात विकासाकडे वेगाने वाटचाल करणारा जिल्हा अशी ओळख निर्माण केली आहे असे डॉ. देवराव होळी यांनी सांगितले*

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link