अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या व्यक्तीस गुप्त बातमीच्या आधारे नागपूर गुन्हे शाखेने केली अटक.
प्रतिनिधी: सतीश कडू नागपूर
नागपूर, दि. २२मे २०२५ रोजी नागपूर गुन्हे शाखेस विश्वसनीय गुप्त बातमीदारांने माहिती दिली की मंगलमुर्ती स्किमच्या बाजुला परसोडी येथे खुशाल मेश्राम वय अं. ३५ वर्ष रा. परसोडी हा त्याच्या जवळील काळया रंगाच्या कापडी थैलीमध्ये अंमलीपदार्थाची विक्री करत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.सदर गुप्त माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस ठाणे बेलतरोडी येथील तपास पथकांचे अधिकारी व अंमलदार यांनी मागील आठ दिवसापासुन पाळत ठेवलेला उपरोक्त नमुद ईसम हा अंमली पदार्थांची विक्री करीत आहे किंवा कसे याबाबतची शहानिशा झाल्यानंतर दि. २२मे २५ सां. ०६.३० वा. दरम्यान मंगलमुर्ती स्किमच्या बाजुला परसोडी येथे सापळा रचुन खुशाल शत्रुघ्न मेश्राम वय ३४ वर्षे रा. पाण्याच्या टाकीजवळ परसोडी श्रमीक नगर झोपडपट्टी नागपूर यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेवुन त्यास तुझ्याकडे गांजा नावाचा अंमली पदार्थ असल्याबाबत गुप्त माहिती प्राप्त झाली असुन आम्हाला एन.डी.पी.एस. कायदयान्वे अंगझडती घ्यावयाची आहे असे सांगितल्यावरून त्यांने त्यांच्याकडे असलेला गाांजा या अंमली पदार्थ मोकळया मैदानामध्ये एका गोंधनचे झाडाखाली असलेल्या पळसाचे झाडाचे झुडपाकडे लपवुन ठेवल्याचे सांगुन त्या ठिकाणावरून एक काळ्या रंगाची कापडी पिशवी काढुन दिली असता सदर पिशवीमध्ये उग्र वास येत असलेला गांजा भरून लपवुन ठेवला असल्याचे दिसुन आल्यावरून सदरचा गांजा ताब्यात घेवुन त्याचे सोबतच्या वजन काट्याने वजन केले असता त्याचे वजन २ किलो ३९९ गॅम अं. कि० ३६०००/- किमतीचे मिळून आल्याने पंचासमक्ष जप्त करून आरोपी विरूध्द पोलीस ठाणे बेलतरोडी येथे २८०/२५ क. २० एन.डी.पी. एस कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
नमुद गांजा बाळगणारा आरोपी खुशाल शत्रुघ्ण मेश्राम याचे विरूध्द पोलीस ठाणे अंबाझरी, बेलतरोडी सोनेगांव येथे गुन्हा नोंद असुन आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असुन आरोपी सदर गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आलेली आहे.
आज रोजी नमुद आरोपीताचा पी.सी.आर. घेवुन गांजा कोठुन आणाला याबाबत तपास करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
सदरची उत्कृष्ठ कारवाई ही मा. रश्मिता राव एन. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ नागपुर व मा. श्री नरेंद्र हिवरे, सहायक पोलीस आयुक्त साो. अजनी विभाग नागपुर शहर यांचे मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पोलीस निरीक्षक रूपाली बावणकर, सपोनि राम कांडुरे, पोउपनि किशोर मालोकार, गभणे सपोउपनि नंदु तायडे, अनिल गढवे, तपास पथकाचे पो. हवा. सुहास शिंगणे, सुमेंद्र बोपचे, रविंद्र आकरे, पोलीस अंमलदार विवेक श्रीपाद, मंगेश प्रमोद भिवगडे, योगेश यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सदरची उत्कृष्ठ कार्यवाही केली.
