अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात
पुणे प्रतिनिधी शंकर जोग
राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई मजुरांच्या पाठीशी. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या सर्व मागण्या सोडवणार
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश डागोर यांचे आश्वासन,
राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश डागोर यांचे नुकतेच पुणे महानगरपालिकेला भेट देण्यात आली. यावेळी पालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश डागोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले, तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी डागोर यांना पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छ विठ्ठल रखुमाई यांचे स्मृती चिन्ह आणि वाल्मिकी ऋषी यांची प्रतिमा भेट देण्यात आली,
यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या संघटनेच्यावतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये मुख्यतः 442 विविध कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये कामावर घेण्यात यावे, यावेळी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांनी सांगितले राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई मजुरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या सर्व मागण्या सोडवणार असल्याचे डागोर नगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आश्वासन दिले,
यावेळी राष्ट्रीय प्रमुख महामंत्री डॉ. सुधाकर पणीकर, एम. एस. जी. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परविन लालबिगे, एडवोकेट कबीर विवाल. दलित मित्र नरोत्तम चव्हाण . कविराज संगिलिया. पुणे शहराध्यक्ष नरेश जाधव.प्रदेश सचिव रवी भिंगानिया, नगरपालिका तक्रार निवारण समिती चा उपाध्यक्ष प्रताप सोलंकी. सदस्य दीपक निनारीया पुणे मनपा युनियन अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर, पुणे मनपा युनियन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने, पुणे मनपा युनियन मुख्य सचिव रवी बेंगळे, पुणे मनपा युनियनचे सचिव सूर्यकांत यादव, पुणे मनपा युनियनचे कार्याध्यक्ष गणेश लालबिगे, तेजस्विनी साडेकर, सहसचिव बाबा गोणेवार, आदि यावेळी उपस्थित होते
