गोपाळ भालेराव | अजिंक्य महाराष्ट्र न्यूज.
बुलढाणा: हिंदी मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र ग्रामीण न्युज यांच्या वतीने आयोजित महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला, महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र कानाकोपऱ्यातील, विविध जिल्ह्यातील ६० मान्यवरांना महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जळगांव जिल्ह्यातून,
दैनिक अधिकारनामा,बाळकडू,सारथी महाराष्ट्राचा,तेजोमय न्युज आदी वृत्तपत्रातून उल्लेखनीय पत्रकारिता, झेप फाउंडेशन पुणे व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल , हिंदी मराठी पत्रकार संघ व महाराष्ट्र ग्रामीण न्यूजने घेतली. महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड ने मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ६ मे रोजी हिंदी मराठी पत्रकार संघ, व महाराष्ट्र ग्रामीण विदर्भ विभाग द्वारा आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गोपाळ कळसकर यांचा महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड २०२५ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल गोपाळ कळसकर यांचे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातून कौतुक केले जात आहे व अभिनंदनाचा बर्षाव होत आहे. यावेळेस महाराष्ट्र एक्सलन्स अवार्ड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निलेश तायडे(माहिती व जनसंपर्क विभाग,मंत्रालय मुंबई,साहाय्यक संचालक) होते.. तर प्रमुख पाहुणे भाई अशांत वानखेडे (संस्थापक समतेचे निळे वादळ), धनश्रीताई काटीकर पाटील (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघ), प्रसाद जाधव (राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष), बाळासाहेब दामोदर (उद्योजक), बंडू चवरे (काँग्रेस नेते), फारुख शेख (ज्येष्ठ पत्रकार लोकमत), दामोदर शर्मा (शेतकरी नेते), वीरसिंह राजपूत (ज्येष्ठ पत्रकार व संपादक मलकापूर दै .आज तक ) हे होते. कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व प्रथम महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात पत्रकारिता, शिक्षण, सामाजिक ,राजकीय ,कला, वैद्यकीय, वकील, उद्योजक अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सत्कार महाराष्ट्र एक्सएलन्स अवार्ड २०२५ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी पहलगाम येथे आतंकवादी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महिलांसाठी मानाचे असे समजले जाणारे गृहरक्षक दलामध्ये कार्यरत असणाऱ्या महिला होमगार्ड भगिनींचा सत्कार देखील या कार्यक्रमात करण्यात आला. सदर कार्यक्रमाला .. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील, विदर्भातील पत्रकार राजकीय मंडळी विविध संघटनेचे पदाधिकारी , नागरिक यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सुरवाडे सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप इंगळे यांनी केले…
