एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

सांस्कृतिक कलादार्पण पुरस्कार सोहळा २०२५

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

मुंबई प्रतिनिधी – गणेश तळेकर

सांस्कृतिक कलादार्पण पुरस्कार सोहळा २०२५ यंदाचा मानाचा आणि सन्मानाचा ” सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार  जेष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि जेष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे आणि
सर्वोत्कृष्ट अभिनेत्या चा मान गश्मीर महाजनी ( फुलवंती) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्राजक्ता माळी (फुलवंती) हिला दिला

 

चंद्रशेखर सांडवे प्रतिष्ठान प्रस्तुत २७ वा सांस्कृतिक कलादर्पण गौरव रजनी पुरस्कार सोहळा दिनांक ८ मे २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता रवींद्र नाटय मंदिर, प्रभादेवी,दादर येथे मोठ्या दिमाखात सांस्कृतिक क्षेत्रातील चित्रपट नाट्य टीव्ही मालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात नाट्य विभागामध्ये सुमुख चित्र निर्मित “उर्मिलायन” आणि कलाकारखाना निर्मित “वर वरचे वधुवर” यांना विभागून सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला .चित्रपट विभागात “फुलवंती” हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला तर टीव्ही मालिका विभागात “घरो घरी मातीच्या चुली” स्टार प्रवाह ही मालिका सर्वोत्कृष्ट ठरली तसेच लक्षवेधी कथाबाह्य मालिकेमध्ये “सोहळा सख्यांचा” सन टीव्ही मालिकेला पुरस्कार मिळाला.न्यूज चॅनेल विभागात “ABP माझा” या चॅनेलला सर्वोत्कृष्ट न्यूज चॅनेलचा पुरस्कार मिळाला

 

यंदाचा मानाचा आणि सन्मानाचा “सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार” ज्येष्ठ अभिनेते सतीश पुळेकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभुणे यांना देण्यात आला. हा पुरस्कार ABP माझाच्या सरिता कौशिक आणि सांस्कृतिक कलादर्पणचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांच्या हस्ते त्यांना सुपूर्त करण्यात आला. यंदाच्या चित्रपट विभागामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्या चा मान गश्मीर महाजनी ( फुलवंती), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्राजक्ता माळी (फुलवंती), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता संतोष जुवेकर (रानटी) व सचिन नारकर, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री स्पृहा जोशी ( शक्तिमान) सर्वोत्कृष्ट विनोदी कलावंत गौरव मोरे ( अल्याड पल्याड) यांना पुरस्कार मिळाला.नाटक विभागामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी ( वर वरचे वधुवर ), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निहारिका राजदत्त ( उर्मिलायन) , सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता प्रियदर्शन जाधव ( दोन वाजून बावीस मिनिटांनी ) , सहाय्यक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नम्रता संभेराव ( थेट तुमच्या घरातून ), यांनी पुरस्कार मिळवले. टी.व्ही मालिका विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेता तन्मय जक्का ( लय आवडतेस तू मला-) कलर्स मराठी , सर्वोत्कृष्ट रेश्मा शिंदे ( घरोघरी मातीच्या चुली ) स्टार प्रवाह, आणि सानिका मोजर ( लय आवडतेस तू मला ) कलर्स मराठी ,सर्वोत्कृष्ट Almirah अभिनेता विभागून – प्रमोद पवार ( घरोघरी मातीच्या चुली) , सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री प्राजक्ता दिघे ( ठरलं तर मग ) स्टार प्रवाह यांना मिळाले.
ह्या पुरस्कार सोहळ्यात अनेक नामवंत कलाकारांनी आणि प्रतिष्ठित क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली.यंदाचे ब्रॉडकस्ट पार्टनर होते ABP माझा आणि को पॉवर्ड होते राम बंधू मसाले आपला टेस्ट पार्टनर तसेच दिनशॉव आईस्क्रीम
सर्व उपस्थितांचे आभार मानले संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link