एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

बालकांकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत राऊंड हस्तगत – भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

मुख्य संपादक: संतोष लांडे पुणे:दिनांक २९/०४/२०२५ रोजी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने कात्रजकडून मांगडेवाडीकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या रतन मोटर्स प्रा लि पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे अशी बातमी मिळाली. लागलीच नमुद पोलीस उप निरीक्षक निलेश मोकाशी व नमुद अंमलदार यांनी रतन मोटर्स प्रा लि पुणे या कंपनीच्या समोरील बाजुस रोडवर जावुन पाहता तेथे एक विधीसंघर्षीत बालक, वय १७ वर्षे, हा त्याचे ताब्यात ५०,०००/- रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,५००/- रुपयांचे मुद्देमालासह मिळून आल्याने त्याचेकडून सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर २२९/२०२५, भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. प्रविणकुमार पाटील साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. श्रीमती स्मार्तना पाटील साो मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम पु. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, किरण साबळे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांच्या पथकाने केली आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Buzz4ai
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link