एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

वाहह मराठी’ दादरमध्ये सुरू झालेला अभिनेत्याचा खास चहा स्टॉल चर्चेत

 

अजिंक्य महाराष्ट्र न्यूज एका सामान्य माणसाची अनोखी सुरूवात 

प्रतिनिधी – किशोर गुडेकर

मुंबई ( दादर )मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत चेहरा आणि अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध अभिनेता म्हणजे मयुर प्रकाश धुरी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी मुंबईतील दादर येथे सुरू केला आहे चहाचा स्टॉल.
संपूर्ण महाराष्ट्रात ओळख निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांतून प्रेक्षकांची मनं जिंकली. शालीय जीवनापासून त्याने अनेक स्पर्धांमध्ये मग त्याआंतरशालेय असो अथवा अंतर महाविद्यालय असो यामध्ये उत्कृष्ट अभिनयाची अनेक पारितोषिक पटकावली.मात्र,अलीकडच्या काळात कामाची संधी कमी मिळत असल्यामुळे त्यांनी त्यांची व्यवसायाची आवड वाढवण्याचा निर्णय घेऊन चहाचा स्टॉल सुरू केला.
स्वकष्टावर आयुष्यात उभे राहायचं हे आधीपासूनच त्यांच्या जगण्याचं मार्ग होता म्हणून वडिलांनी 80 च्या दक्षकात सुरू केलेला चहाचा स्टॉल हा आता एक ब्रँड म्हणून सगळ्यांना समोर आणायचा असा निर्धार मनाशी धरून “वाहह…मराठी दादर स्पेशल” ह्या नावाने व्यवसायात उतरले” असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या या धाडसी निर्णयाचं समाजमाध्यमांवर कौतुक होत आहे.
या प्रसंगातून अनेक कलाकारांसमोरील जगण्याचे अनेक धडपडी समोर आल्या अभिनयासारख्या अनिश्चित क्षेत्रात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून मार्ग काढणारी धाडसाची गोष्ट ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यातच त्यांच्या दुकानाच्या नावावरून त्याचे मराठी भाषेवरील प्रेम सुद्धा दिसून येते. चहा पासून सुरू केलेला हा स्टॉल आता मॉकटेल्स पासून सँडविच असे जवळ जवळ पंचेचाळीस पदार्थ लोकांच्या पसंती पडत आहे
वडिलांच्या अकस्मात निधनानंतर घरची जबाबदारी सोबत स्वतःचा करिअर देखील सांभाळत पुढे जाणे हे देखील तितकच महत्त्वाचं होतं म्हणून
व्यवसाय जरी करीत असले तरी कलाक्षेत्रापासून लांब जाण्याची त्यांची जराही मानसिकता नाही हे त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. दिवाळी मध्ये दादर कबूतर खाना येथे गेली अठरा वर्ष अविरत आणि लोकांच्या पसंतीला उतरलेला वाहह मराठी दिवाळी फराळ याबद्दल सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या भावना स्पष्ट दिसू येतात.
अशा या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाला भेटून फार ऊर्जावान वाटू लागले यात काही शंकाच नाही तरी आपण जरूर यांच्या स्टॉलवर भेट द्या

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

AI Tools Indexer
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link

error: Content is protected !!