पोलीस अन् महसूल प्रशासनातील कोहिनूर हिरा, ओळखले जाणारे संभाजी पुरीगोसावी सातारकरांचा मंगळवारी अभिष्टचिंतन सोहळा
प्रतिनिधी. सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगांव तालुक्यांतील वाघोली गावचे सुपुत्र संभाजी बबनराव पुरीगोसावी त्यांचा मंगळवारी अभिष्टचिंतन सोहळा संपन्न होणार आहे, पोलीस महसूल प्रशासनातील अधिकारी कर्मचारी तसेच पत्रकार सहकारी मित्रपरिवार अशा विविध राजकीय सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे, महाराष्ट्रांच्या पोलिस अन् महसूल खात्यात अधिकारी कर्मचाऱ्यांशी दांडगा जनसंपर्क असणारे आणि पोलीस महसूल प्रशासनातील कोहिनूर हिरा म्हणून ओळखले जाणारे धडाकेबाज पत्रकार संभाजी पुरीगोसावी सातारकरांची चांगलीच ओळख आहे, अगदी शालेय शिक्षण कमी असूनही सन 2017 पासून त्यांनी पोलिस अन् महसूल प्रशासनात आपला जनसंपर्क दांडगा निर्माण केला आहे, कोणताही अनुभव नसताना धडाकेबाज पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जाते, पुरीगोसावी हे सर्व सामान्य आणि गोरगरीब कुटुंबातील आहेत, अगदी समोर शिपाई जरी असले तरी जयहिंद …साहेब असे म्हणून त्यांनी आजपर्यंत आपले नाव प्रशासनात चांगलेच ठेवले आहे, पण शिक्षण कमी असूनही आज बड्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहणं हे एवढेही सोपं नाही, किंवा त्यांना भेटणे त्यांचे स्वागत आदर सन्मान करणे हा पुरीगोसावी यांचे नेहमीचे वेळापत्रक ठरलेलेच आहे, परंतु त्यांचं काम पाहून समोरच्या व्यक्तीला असं वाटत आहे की पुरीगोसावी यांचे शिक्षण हे किमान 13 वी 14 असावं, पण खरं त्यांचा शिक्षण फक्त 9 वी पर्यंत झाले आहे, परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही त्यात वडिलांचे छत्र हरपले, त्यामुळे पुढे शिक्षणाचा पाया आम्हांला थांबवावा लागला,
