एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

पुणे आंबेगाव पोलिसांची कौशल्य पूर्ण कामगिरी

जमीनीच्या वादातुन तरुणाचा निर्घृन खुन करुन पसार झालेल्या आरोपींना मोहोळ, सोलापुर येथुन २४ तासाच्या आत केली अटक,

आंबेगाव पोलीसांची कौशल्यपुर्ण कामगिरी.

प्रतिनिधी: गोपाळ भालेराव

पुणे :(कात्रज)=कात्रज येथे जमीनीच्या वादातुन दिनांक २०एप्रिल २०२५ रोजी पहाटे ०३:४५ वाजताच्या सुमारास साईछत्र अपार्टमेन्टच्या पाठीमागील जागी, ओमसाई मित्र मंडळाशेजारी, कात्रज पुणे येथे एका तरुणाचा निर्घृनं खुन झाल्या बाबत आंबेगाव पोलीस स्टेशन गु.रजी. नं.६६/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम १०३,३ (५), ११५(२), ३५१(२), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या अनुषंगाने. सदर गुन्ह्याच्या तपासात सदरचा गुन्हा करणारे आरोपी निष्पण करुन तांत्रीक विश्लेषणाव्दारे सदरचे आरोपी हे मु. कामती खु, ता मोहोळ येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व पोलीस अंमलदार हणमंत मासाळ, धनाजी धोत्रे, नितीन कातुर्डे असे मोहोळ येथे जावुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तांत्रीक विश्लेषण करुन गुन्हयातील आरोपी हे मंगळवेढा ते सोलापुर हायचे रोडवर, समाधान हॉटेल समोर, मु.कामती खु, ता. मोहोळ येथे मिळून आल्याने त्यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवुन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक- स्वाती देवधर हे करत आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे-
१) अमर दिलीप साकोरे वय-४० वर्षे रा. संतोषनगर, कात्रज पुणे
२) मंदार मारुती किवळे वय ३५ वर्षे रा. नवीन वसाहत, कात्रज पुणे३) गिरीष सुभाष बाबरे वय-२६ वर्षे रा संतोषनगर, कात्रज पुणे.४) योगेश बाबुराव डोरे वय ३५ वर्षे रा. खोपडेनगर कात्रज पुणे.ह्यांना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी पोलीस स्टेशनं आंबेगाव येथे ठेवण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त, पुणे शहर मा. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त मा. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे- मा. प्रविणकुमार पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ-२ पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे- श्री. राहुल आचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती देवधर, भोजलींग दोडमीसे, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, राजेंद्र वंजारी, पोलीस अंमलदार राजेश गोसावी, हणमंत भासाळ, गणेश दुधाने, प्रसाद टापरे, चेतन गोरे, निलेश जमदाडे, आदिनाथbb देवकर, प्रकाश विटेकर यांच्या पथकाने केली असून
अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, हरीश गायकवाड या पथकाणे केली असून त्यांचे वरिष्ठांकडून कौतुक केले जात आहे.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

कार्यकारी संपादक किरण सोनवणे.
8010471539

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Santosh lande
Kiran sonawane

Founder/director

Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link