प्रतिनिधी: श्रीहरी अंभोरे. वसमत :(हिंगोली) वसमत तालुका कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो.
वाळू. दारू. मटका.चंदन.राशन धान्य. गुटखा. मुरूम.आदिची तस्करी सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे.
हिंगोली जिल्हा भरात गेल्या अनेक दिवसापासून अवैध धंदे चालू असून यांचे देव कुठले असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला. असून जिल्हाभरात वसमत तालुक्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचे जाळेमुळे पसरले आहेत त्यातच हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गत सर्वाधिक अवैध व्यवसाय हट्टा पोलीस स्टेशन अंतर्गत सुरूच असून या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अनेक गावात पोलीस प्रशासनाचे मोरके सुद्धा पाहायला मिळत आहेत दारू तस्करी वाळू तस्करी व अवैध गौण तस्करी त्याचबरोबर गांजा. मटका. जुगार अनेक ठिकाणी बेसुमार व्यवसाय करून पोलीस प्रशासन आपली भागीदारी सुरू ठेवत असल्याचे मोरक्या मार्फत दिसून येत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या विरोधात वर्तमानपत्रातून व न्यूज चैनल च्या माध्यमातून कधीकाळी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर कुठेतरी एखाद्या दारुड्यावर किंवा अवैध तस्करी करणाऱ्या चंदन.गांजा. अशा वाहनावर कारवाई करून तात्पुरती मलमपट्टी करण्याचे काम वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस स्टेशन व वसमत पोलीस स्टेशन ग्रामीण करत आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी वसमत तालुक्यात सुरूच आहे तालुक्यातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनाचे मोरके असून ते पोलीस प्रशासनातला हात मिळवणी करून अवैध व्यवसाय करत आहे. असे दिसून येते.
