दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे यांनी ठाणे कोपरी मुंबई येथील 86 टक्के पायात दिव्यांग असणाऱ्या अनिता विश्वकर्मा यांना पुण्यावरून जाऊन मोफत व्हीलचेअर भेट दिली.
ही व्हीलचेअर पुण्यातील लोहगाव येथील श्री वसंतजी खांदवे सर यांनी त्यांच्या दिवंगत मातोश्री यांच्या स्मरणार्थ मधु ताराच्या गरजू दिव्यांगांपर्यंत पोहचावी म्हणून भेट दिली होती.
ठाणे कोपरी येथील मा.नगरसेविका मालती ताई पाटील आणि रमाकांत दादा पाटील शिवसेना शिंदे गट यांच्या अंजनी पुत्र वीर हनुमान सेवा संस्था यांच्या भव्य आरोग्य शिबिरात मधु तारा सहकारी श्री नरेशजी मोरे सर.जयस्वाल साहेब.मालती ताई पाटील.रमाकांत दादा पाटील यांच्या हस्ते व्हीलचेअर अनिता विश्वकर्मा यांना देण्यात आली.
या वेळी दिव्यांग अनिता विश्वकर्मा यांनी व्हीलचेअर मिळाल्याबद्दल मधु ताराचे आभार व्यक्त केले.
या वेळी नगरसेविका मालती पाटील यांनी पुण्यावरून येऊन व्हीलचेअर आणल्याबद्दल मधु तारा प्रमुखांचे कौतुक केले. राज्यभर रुग्णांसाठी दिव्यांगांसाठी निःस्वार्थ पणे कार्य मधु तारा फाऊंडेशन करते आणि आम्ही नेहमीच मधु तारा सोबत जुळून राहू असे शिवसेना संघटक कोपरी ठाण्याचे श्री रमाकांत दादा पाटील यांनी म्हटले.या वेळी मधु तारा सोबती श्री नरेशजी मोरे यांनीही मधु तारा सोबत आपण नेहमीच सोबत राहून कार्य करीत असल्याने आज आरोग्य शिबिरात दिव्यांग व्यक्तीला व्हीलचेअर देण्यासाठी आज सोबत आहोत याचा आनंद होतोय.या वेळी मधु तारा सहकारी श्री जयस्वाल साहेब यांनीही आनंद व्यक्त करत मधु ताराच्या कार्याचे अभिनंदन केले.
या वेळी वीर हनुमान सेवा संस्था यांच्या वतीने मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे.श्री नरेशजी मोरे.श्री जयस्वाल साहेब यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रसारमाध्यमांनीही मधु ताराच्या कार्याची दखल घेतली.
