राज्यातील प्रत्येक दिव्यांगांसाठीमधु तारा प्रत्येकांसाठी.
संपादकीय
दिनांक.8 एप्रिल 2025 रोजी मधु तारा दिव्यांग सेवा सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने आणि पुण्यातील साधू वासवानी मिशन यांच्या माध्यमातून पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या तरुणी रोहिणी बोटे यांना मोफत कृत्रिम पाय बसवण्यात आला.*
*शिरूर येथील हाडवैद्य डॉ विक्रम कर्डिले सर यांनी मधु तारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे सर यांना रोहिणी बोटे यांची माहिती दिली होती.*
*साधू वासवानी मिशन संस्थेचे टेक्निशियन श्री ज्ञानेश्वरजी पाटील सर आणि त्यांच्या टीम ने खूपच चांगल्या प्रकारे सहकार्य करत हे पवित्र कार्य केल आहे तसेच नेहमीच अशा पवित्र कार्यात दिव्यांगाना त्यांच्या जीवनात सक्षम बनवण्याचे कार्य मधु ताराच्या अनेक* *दिव्यांगांसाठी साधू वासवानी मिशन करीत आहे मधु तारा नेहमीच आपली आभारी राहील असे भावनिक उदगार मधु तारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी काढले.*
*या वेळी रोहिणी बोटे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मधु तारा आणि साधू वासवानी मिशन यांचे आभार व्यक्त केले.*
