डिस्टिल एज्युकेशनने व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात सात यशस्वी वर्षे पूर्ण केली असून, संपूर्ण भारतभर 1 लाखांहून अधिक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. संस्था केंद्र आणि राज्य शासनाच्या पीएम अप्रेंटिसशिप योजना आणि सीएम युवा कार्य प्रशिक्षण योजना यांसारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देत गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहे.
कौशल्य रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या सहकार्याने, डिस्टिल एज्युकेशनने विविध रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले असून, कुशल उमेदवारांना योग्य नोकऱ्या मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
संस्थेच्या प्रभावी कार्याची दखल घेत, दैनिक भास्कर समूहाने “इमर्जिंग व्होकेशनल एज्युकेशन कंपनी ऑफ द इयर” या पुरस्काराने सन्मानित केले आहे. श्री. विनेश मोरे आणि श्री. अर्जुन मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली, डिस्टिल एज्युकेशन युवा पिढीला सक्षम करून देशाच्या प्रगतीस हातभार लावत आहे.
