एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

एका सामान्य माणसाची‌ अनोखी सुरूवात.

Best News Portal Development Company In India

महिला बेरोजगार प्रशिक्षण व सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

मुंबई : “तू स्वयं सिद्ध हो” या अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन मुंबई शहर आणि बी इन ग्रुप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बेरोजगार प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिर पार पडले.सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ऍड. योगिता सावंत यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे. समाजसेवक श्री. संजय माळी आणि बी इन ग्रुप फाउंडेशनच्या विश्वस्त रोहिणी जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा गायकवाड यांनी प्रभावीपणे केले, तर वैशाली पवार आणि त्यांच्या टीमच्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जगदीश गायकवाड, उमेश गायकवाड, गणेश भालेराव, योगिता सावंत, रामचंद्र घाडगे, मंजुळा मोरे, लता खराडे आणि नम्रता कदम यांनी विशेष मेहनत घेतली.

कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये प्रसिद्ध उद्योगपती नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला, काँग्रेस नेते चरणजित सप्रा, डॉ. शैलेश जाधव, काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. जीवनदत्त अरगडे आणि संजय निंबाळकर यांचा समावेश होता.

समाजासाठी भरीव कार्य :

बी इन ग्रुप फाउंडेशन समाजाच्या वंचित घटकांसाठी सातत्याने कार्यरत आहे. आदिवासी पाडे, भटक्या-विमुक्त समाजाच्या वस्त्यांमध्ये कपडे, अन्नधान्य, औषधे वाटप तसेच मेडिकल आणि एज्युकेशनल कॅम्प राबवले जातात.

Share this post:

मुख्य संपादक संतोष लांडे.
9175941294.

बातम्या व जाहिराती साठी संपर्क

खबरें और भी हैं...

पुणे येथे वाहतूक संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रिक्षा चालकांच्या विविध ज्वलंत समस्या व अडचणी संदर्भात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात लेखी निवेदन सादर करण्यात आले

Read More »

लाइव टीवी

Ajinkya Maharashtra news
rudraraj production
Traffic Tail

लाइव क्रिकट स्कोर

Market Mystique
Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Follow us on

Quick Link