अजिंक्य महाराष्ट्र न्यूज – संपादक संतोष लांडे. सार्वजनिक बस सेवा ही सर्वात सुरक्षित व विश्वासार्ह सेवा मानली जाते, मात्र स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या संतप्त प्रकाराने या विश्वासाला तडा जातो की काय… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आज पुणे शहर व जिल्ह्यातील माता-भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी, PMPML, MSRTC यांचे बस स्थानक प्रमुख, पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेतली. सर्व बस स्थानकांमध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात अशा सूचना यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी, एम.डी. पीएमपीएमएल दीपा मुधोळ, पंकज ढावरे विभागीय नियंत्रक (DC) एस टी महामंडळ पुणे, मनीषा बिरासीस जिल्हा महिला व बालविकास अधीकारी, राहुल आवारे ACP स्वारगेट पोलीस स्टेशन, राधाकृष्ण देवढे उपमुख्यकार्यकारी अधीकारी जि.प.पुणे उपस्थित होते.
